ना हात ना पाय, तरी असं आयुष्य जगतोय हा माणूस की जगातली माणसं घालतील तोंडात बोट

0

 

अनेक लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर उंचच्या उंच अशी यशाची उंची गाठतात. तेव्हा तर इच्छाशक्तीच्या बळावर माणूस काहीही करून जातो, जेव्हा प्रश्न स्वतःच्या जगण्याचा असेल. पण जगायला तुमचं शरीर, तुमची आर्थिक स्थिती धडधाकट हवी असे अनेकांना वाटते.

पण ही गोष्ट याच्या अपवाद आहे. तुम्ही कधी असा विचार केला आहे का? की जर तुम्हाला हात आणि पाय दोन्ही नसते तर तुम्ही कसे जगले असता. नक्कीच हा विचार कोणीच करू शकत नाही. मात्र असाच एक माणूस ऑस्ट्रेलियामधला आहे, पण तो जगतो असा की लोकही तोंडात बोट घालून बसतील.

निक वूजिकीक असे या तरुणाचे नाव आहे. ४ डिसेंबर १९८२ मध्ये निकचा जन्म झाला. निकला जन्मापासूनच दोन्ही हात दोन्ही पाय नाही. त्याच्या डाव्या मांडीच्या खाली एक छोटा पाय होता. तरी निकने आपल्याला हवे ते यश प्राप्त केले आहे.

निकचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याला बघून त्याच्या आई-वडीलांना विश्वासच बसला नाही. निकला हात पाय नव्हते, हा धक्का तर त्याच्या आईला सहन न झाल्याने त्या ४ महिने मानसिक तणावात होत्या, मात्र त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरून घेतले.

जेव्हा निक १८ महिन्यांचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला सर्व काही शिकवायचे असे ठरवले. त्याला कुठलाही अपंगत्वाचा आभास त्यांनी होऊ दिला नाही. ते निकला पाण्यातही उतरवायचे.

निकच्या संगोपनासाठी त्याची आई काम करत होती. त्याच्या आईने निकला पेन पकडता यावा यासाठी एक प्लास्टिकचे छोटे उपकरण तयार केले. त्यामुळे निकला त्याच्या छोट्या पंजाने पेन पकडता येत होता.

निकला जेव्हा शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हा पालकांना निकचे काळजी वाटायला लागली. निक शाळेत कसा शिकेल, त्याचे सहकारी त्याच्याशी व्यवस्थित तर वागतील ना, असे वेगवेगळे प्रश्न त्यांच्या आईवडिलांना पडू लागले होते, मात्र शाळेने पुढाकार घेऊन निकला आपल्या शाळेत प्रवेश दिला.

निकला शाळेत प्रवेश मिळाल्याने त्याचे आई वडील खूप आनंदी होते, तसेच घटना निकचा जीवनाला देखील एक वेगळे वळण देणार होती. निकने पुढेही शिक्षण सुरूच ठेवत फायनान्शिअल प्लॅनिंग आणि रियल इस्टेटमध्ये डिग्री घेतली.

निकला रोजच्या जीवनात संघर्ष करावा लागत होता. रोजच्या कामात देखील त्याला कसरत करावी लागत होती. १० वर्षाचा असताना माझ्या मनात आत्महत्या करण्याचे विचार देखील आले होते, असेही निकने म्हटले आहे.

निक जसा जसा मोठा होऊ लागला तसे तसे त्याला खूप काही कळू लागले. तो जेव्हा १३ वर्षाचा होता तेव्हा त्याने शरीराच्या अपंगत्वावर मात करून पुढे कसे जाता येईल, याबद्दलचे लेख वाचू लागला. आपणही काहीतरी प्रेरणादायी करून लोकांपुढे आदर्श निर्माण करावा, अशी इच्छा त्याच्या बनली.

त्यामुळे त्यांनी २००८ पासून जगाच्या प्रवासाला सुरुवात केली आणि निकने लोकांना प्रेरणादेण्याचे कार्य सुरू केले. निकने असे अनेक कामे करतो जे एखाद्या सामान्य माणसाला करणेही शक्य होत नाही.

निक गोल्फ खेळतो फुटबॉल खेळतो, तसेच पोहणे आणि सर्फिंग देखील निक करतो. निकला १९९० रोजी यंग ऑस्ट्रेलियन सिटीझन पुरस्कार मिळाला आहे. निकच्या इच्छाशक्तीमुळे निकने खूप काही मिळवले आणि इतकेच नाहीतर त्याच्या संघर्षाने अनेक लोकांना जीवन जगण्यासाठी प्रेरणादेखील दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.