शिक्षकाची नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय; आज महिन्याला कमवतेय लाखो रुपये..

0

 

आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असे आपण ठरवत असतो, पण जर तुम्हाला ध्येय गाठायचे असेल, तर त्यादिशेने धाव घेणे गरजेचे आहे. अशीच एक गोष्ट आहे, गुजरातच्या मीनाबेन शर्मा यांची. काहीतरी वेगळं करायचे म्हणून चांगली नौकरी सोडून एक व्यवसाय सुरू केला आणि त्यात त्यांनी यश मिळवले.

गुजरातच्या बडोदा येथे राहणाऱ्या मीनाबेन यांनी दोन वर्षांपूर्वी आपली नोकरी सोडली. त्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या. या नोकरीत त्यांना पगार चांगला होता, मात्र कामात त्यांचे मन लागत नव्हते, म्हणून त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

नोकरी सोडल्यानंतर मीनाबेन यांनी पोळ्या बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. १०० पोळ्यांपासून सुरू होणारा व्यवसाय आज ४ हजार पोळ्यांवर गेला आहे. त्यांची वर्षाची उलाढाल जवळपास ३० लाखांपर्यंतची आहे.

बडोदामध्ये राहणाऱ्या मीनाबेन यांनी एमडी कॉर्पोरेशन नावाने पोळ्या बनवण्यास सुरुवात केली. याआधी त्या एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्या कामात मीनाबेन यांचे मन लागत नव्हते. मीनाबेन यांना स्वतःचे काहीतरी सुरू करायचे होते.

मीनाबेन यांना महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने धाव घेण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये मीनाबेन यांनी जिल्हा उद्योग केंद्रापासून PMRY योजने अंतर्गत ७ लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यांनी पोळ्या बनवण्याच्या व्यवसायाची सुरूवात केली.

गुजरातमध्ये जेवणात पोळ्याचा उपयोग जास्त होतो. गुजरातमध्ये भात कमी आणि पोळ्या जास्त खाल्ल्या जातात. त्यामुळे मीनाबेन यांनी पोळ्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातमध्ये पोळ्यांमध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात. आता मीनबेन यांच्या पोळ्यापण तिथल्या कंपन्या आणि कँटीनपर्यंत पोहचल्या आहे.

सुरवातीला १०० पोळ्यांपासून मीनाबेन यांनी सुरुवात केली होती. काही महिन्यानंतर हळूहळू त्यांचा संपर्क वाढत गेला आणि त्यांना ऑर्डर मिळत गेल्या. आज मीनाबेन दिवसाला ४ हजार पोळ्या सप्लाय करत आहे. तसेच १० महिलांना मीना यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

मीनाबेन यांच्या कंपनीच्या पोळ्या औद्योगिक कंपन्यांमधल्या कँटीनमध्ये मोठ्या प्रमाणात सप्लाय केल्या जातात. १ पोळीची किंमत १.७० रुपये आहे. आता मीनाबेन यांनी पोळ्यांसोबतच पराठे आणि पुरी बनवायला सुरुवात केली आहे.

मीनाबेन यांच्याकडे सध्या २ पोळ्या बनवण्याच्या मशीन आहे. त्यांना पुढे पोळ्या बनवणाच्या आणखी मशीन घ्यायच्या आहेत. ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढेल आणि महिलांना रोजगारही देता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.