वडील एएसपी, बायको न्यायाधीश असूनही ‘तो’ इन्सपेक्टर भिकाऱ्याचं आयुष्य का जगतोय? वाचा..

0

 

सध्या सोशल मीडियावर मध्य प्रदेशातील एका भिकारी माणसाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो एकेकाळी सब इन्स्पेक्टर होता, मात्र मानसिक संतुलन बिघडल्याने त्याची अशी अवस्था झाली असल्याचे म्हटले जात आहे. या माणसाचे नाव मनीष मिश्रा आहे जाणून घेऊया त्यांची गोष्ट….

मनीष मिश्रा गेल्या १० वर्षांपासून ग्वालीयरच्या रस्त्यांवर फिरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आश्रमात राहण्यासाठी आले आहे. मनीष मिश्रा यांच्यासोबत काही वर्षांपूर्वी काम केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच मिश्रा यांना आश्रमात उपचारासाठी आणले आहे.

मनीष मिश्रा १९९९ च्या बॅचमधील पोलीस अधिकारी होते. मनीष मिश्रा यांची अचूक नेमबाज म्हणून ओळख होती. मिश्रा सुरुवातीला आपल्या कुटुंबासोबत राहत होते, मात्र त्यांच्या मानसिक संतुलन बिघडल्याने ते घरातून कुठेही निघून जायचे.

२००५ पर्यंत मनीष मिश्रा यांनी नोकरी केली होती. त्यानंतर त्यांचे मानसिक संतुलन आणखी बिघडले. त्यामुळे ते कुटुंबासोबत राहायला लागले. ज्या रुग्णालयात त्यांना भरती केलेले होते तिथूनही मिश्रा पळून गेले.

कुटुंबाला माहीत नव्हते, मनीष मिश्रा कुठे आहे. मनीष यांचा त्यांच्या पत्नीशी देखील घटस्पोट झालेला होता. त्यानंतर ते जवळपास १० वर्षे रस्त्यांवर फिरून असे जीवन व्यथित करत होते.

मिश्रा यांची पत्नी न्यायाधीश होती, तर त्यांचे वडील हे एएसपी होते. तसेच त्यांचा भाऊ हा पोलिस कर्मचारी होता, त्यामुळे एवढं असूनही मनीष यांची अशी परिस्थिती कशी झाली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच मिश्रा रस्त्यावर थंडीत कुडकुडत असताना मिळाले आहे. डीएसपी रत्नेश सिंग तोमर आणि विजय भदौरिया यांना मिश्रा रोडवर कुडकुडत दिसले. तेव्हा त्यांना मिश्रा हे ओळखू आले नाही. त्यांनी मिश्रा यांना एक भिकारी समजून बूट आणि जॅकेट दिले.

जेव्हा ते पोलीस तिथून निघत होते, तेव्हा मिश्रा यांनी त्या पोलिसांना नावाने हाक मारली, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. तेव्हा त्यांना असे लक्षात आले की हे तर त्यांचेच बॅचमेट मनीष मिश्रा आहे. त्यांनी लगेच मिश्रा यांना उपचारासाठी सोबत घेऊन जायचे ठरवले, मात्र मिश्रा यांनी नकार दिला.

मिश्रा यांनी दिलेल्या नकारामुळे पोलिसांनी काही समाजसेवी संस्थांकडून मदत घेतली आणि मिश्रा यांना आश्रमात उपचारासाठी दाखल केले. आता मिश्रा यांच्यावर उपचार सुरू आहे, मिश्रा यांची स्थिती आता सुधारत चालली आहे, असे स्वर्गसदन आश्रमाचे संचालक पवन सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.