१२ वर्षांच्या असताना कविता लिहायच्या सरोजिनी नायडू, भारत देशातील पहिल्या महिला राज्यपाल

0

आपल्यापैकी बहुतेकांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असते, परंतु ज्यांची स्वप्ने पूर्ण होतात असे खुप कमी लोक या जगात आहेत. सरोजिनी नायडू हे असेच एक नाव आहे जे आपण सर्वांनी पुस्तकांमध्ये वाचले आहे. सरोजिनी नायडू त्या महिलांपैकी एक आहेत ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी कठोर संघर्ष केला. सरोजिनी नायडू या भारताच्या कोकीळा या नावाने ओळखल्या जातात.

स्वातंत्र्यसैनिक, कवयित्री आणि देशातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू यांनी बालपणातच अनेकांना आपल्या कौशल्याने प्रभावित केले होते. वयाच्या १२ व्या वर्षातच सरोजिनी नायडू यांनी मोठ्या वर्तमानपत्रांत लेख आणि कविता लिहायला सुरुवात केली होती.

सरोजिनी नायडू कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. एवढेच नाही तर त्या देशातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. सरोजिनी नायडू यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय एक वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञ होते.

त्यांची आई वरदा सुंदरी ह्या एक कवायित्री होत्या आणि त्यांनी बंगालीमध्ये कविता लिहिल्या आहेत. सरोजिनी नायडू यांचे वयाच्या १९ व्या वर्षी गोविंदाराजुलु नायडूशी यांच्याशी लग्न झाले होते. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात विशेष योगदान दिले.

लहानपणापासूनच कविता लिहायला त्यांना आवडायचे आणि त्यांच्या कविता सगळ्यांनाच आवडायच्या. त्यांचा ‘द गोल्डन थ्रेशोल्ड’ हा कवितासंग्रह १९०५ मध्ये प्रकाशित झाला. त्याचे उच्च शिक्षण किंग्ज कॉलेज लंडन आणि नंतर केंब्रिजमधील गिर्टन कॉलेजमध्ये झाले.

सरोजिनी नायडू यांनी गांधीजींच्या अनेक सत्याग्रहांमध्ये भाग घेतला आणि १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ चळवळीत त्या तुरूंगातही गेल्या होत्या. सरोजिनी नायडू यांना अनेक भाषा येत होत्या. इंग्रजी, हिंदी, बंगाली किंवा गुजराती या प्रादेशिक भाषाही त्यांना येत होत्या. लंडनच्या मेळाव्यात इंग्रजीत बोलून त्यांनी तेथे उपस्थित सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. सरोजिनी नायडू यांना “द नाईटिंगेल ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जाते.

त्यांच्या कवितांमधे लहान मुलांच्या, निसर्गाच्या, देशभक्तीच्या, प्रेमाच्या आणि मृत्युच्या कविता आहेत. विशेषतः लहान मुलांच्या कविता करण्याकरीता त्या प्रसिध्द होत्या. त्यांच्या कविता वाचून बरेच लोक आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रमून जात असत.

त्यांच्या कवितांमधे एक खोडकरपणा आढळुन यायचा त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या लहानपणाची झलक सापडायची त्यामुळे अनेक लोकांना त्यांच्या कविता वाचून आपले लहानपण आठवायचे. त्यामुळे त्यांना भारताच्या कोकीळा म्हणून नाव पडले होते. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच मॅट्रीकची परिक्षा पास केली होती. त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून खुप संघर्ष केला होता

. जेवढे योगदान स्वातंत्र्यासाठी पुरूषांनी दिले होते तेवढेच योगदान महिलांनीही दिले होते. अनेक महिला आपल्या परिवाराला सोडून या लढ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या त्यातीलच एक नाव होते सरोजिनी नायडू. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.