वायफायचे संशोधक निकोला टेस्ला यांनी केलेल्या या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या, वाचा त्यांच्याबद्दल..

0

१९ व्या शतकातील निकोला टेस्ला हे एक महान शोधक आणि शास्त्रज्ञ होते. टेस्ला १९५६ मध्ये जन्मलेले, एक शोधक, यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि भौतिक अभियंता होते. त्यांनी वाय-फायसह अनेक शोध लावले. वायरलेस कम्युनिकेशन रिमोट कंट्रोल, निऑन लाइट, एक्स-रे, रडार टेक्नोलॉजी, अल्टरनेटीव करंट, नायगारा फॉल यावर त्यांनी पहिला हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट बनविला होता.

वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या भविष्यवाणीने त्यांना आजही जिवंत ठेवले आहे. टेस्ला यांनी केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. वायरलेस तंत्रज्ञानाची आवड असल्यामुळे टेस्ला यांनी डेटा ट्रान्समिशनवर लक्ष केंद्रित करून अनेक शोध लावले आणि त्यासंबंधी त्यांनी अनेक सिद्धांत विकसित केले.

गिलर्मो मार्कोनी यांनी प्रथम मोर्सेस कोडद्वारे अटलांटिकमध्ये पत्रे पाठविली पण टेस्ला यांना यापलिकडे काहीतरी करायचे होते. एक दिवस वायरलेस तंत्रज्ञानाचा उपयोग जगभरातील टेलिफोन सिग्नल, कागदपत्रे, संगीत फाईल्स आणि व्हिडिओ पाठवण्यासाठी केला जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती आणि आज वाय-फायद्वारे हे शक्य झाले आहे.

पण ते स्वता काही यातील शोध तयार करू शकले नाही पण त्यांची वर्ल्ड वाईड वेबची भविष्यवाणीही खरी ठरली. टेस्लाने यांनी अशी कल्पना केली की अशी विमानं असतील की जगात वेगाने आणि देशांमधील विविध भागात वेगाने फिरतील. या विमानात अनेक प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था असेल.

निकोला टेस्ला म्हणाले होते की, वायरलेस उर्जाचा सर्वात महत्वाचा वापर नॉन-फ्यूल फ्लाइंग मशीनमध्ये होईल, जे काही तासांत न्यूयॉर्कमधील युरोपला घेऊन जाईल. त्यावेळी त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही त्यांना वेड्यात काढण्यात आले पण नंतर त्यांची हीसुद्धा भविष्यवाणी खरी ठरली.

टेस्ला यांनी १९२६ मध्ये एका अमेरिकन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आणखी एक भविष्यवाणी केली होती. त्यांनी फोटो, संगीत आणि व्हिडिओ प्रसारित करण्याच्या आपल्या कल्पनेला ‘पॉकेट टेक्नॉलॉजी’ असे नाव दिले. स्मार्टफोनच्या शोधाच्या १०० वर्षांपुर्वी त्याने त्याचा अंदाज वर्तविला होता.

सन १९९८ मध्ये, टेस्ला यांनी एक वायरलेस आणि रिमोट नियंत्रित ऑटोमेशन प्रदर्शित केले होते. आजच्या काळात आपण त्याला रिमोटवर चालणारी टॉय शिप किंवा ड्रोन म्हणतो. वायरलेस कम्युनिकेशन, रोबोटिक्स, लॉजिक गेट यासारख्या नवीन तंत्रज्ञानाने त्यांनी लोकांना चकित केले.

लोकांना तरीही विश्वास बसत नव्हता लोकांना वाटायचे कोणीतरी माणूस त्या मशिमध्ये बसून त्याला कंट्रोल करत आहे. टेस्ला यांनी अनेक संशोधने केली पण लोक त्यांना वेडे समजत होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.