ताजमहाल, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन विकणारा व्यक्ती, भारतातला सगळ्यात मोठा ठग

0

भारतात अनेक ठग असतील पण त्या ठगांमध्ये एक ठग असा होता की त्याला आजच्या काळातील अनेक ठग गुरू मानतात. एवढच काय त्याचे नावही वापरतात. तुम्ही नटवरलाल हे नाव ऐकले असेलच पण तुम्हाला माहिती आहे का हे नाव सर्वात आधी कोणासाठी वापरले गेले होते. मिथलेश कुमार श्रीवास्तव असे त्या ठग्याचे खरे नाव होते.

त्यासाठी नटवरलाल हे नाव सर्वात आधी वापरण्यात आले होते. त्याचा जन्म बिहारच्या सिवान जिल्ह्यात झाला. टाटांपासून बिर्ला, अंबानींपर्यंत कोणीही याच्या फसवणूकीपासून वाचू शकले नाही. त्यांनी ताजमहाल, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन आणि अगदी संसद भवनसुद्धा विकले होते.

तेही एक वेळा नाही तर बऱ्याच वेळा. हा असा ठग होत्या जो त्याच्या कारनाम्यांमुळे सगळीकडे चर्चेचा विषय बनला होता. हा असा ठग होता ज्याच्या गावातल्या काही लोकांना त्याचा आपल्या गावात जन्म झाला असल्याचा अभिमान वाटायचा. एक ठग ज्याला देशभरातले ठग आपला आदर्श मानतात.

या ठग्याचे नाव नटवरलाल ठेवल्यानंतर सगळेजण हेच नाव वापरू लागले. पण खरा तो खराच असतो असे म्हणतात. मिथलेश कुमार श्रीवास्तव यांचा जन्म १९१२ मध्ये बिहारच्या सीवान जिल्ह्यात बंगरा गावात झाला. तो ठग होण्यापूर्वी वकील होता. नटवरलाल यांनी आपल्या हयातीत शेकडो लोकांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आणि त्याच्याकडे ५० हून अधिक बनावट नावे होती.

तो प्रसिद्ध लोकांच्या बनावट स्वाक्षर्‍या करण्यातही पारंगत होता. त्याने बड्या उद्योगपतींना लुटले होते ज्यात टाटा, बिर्ला आणि अंबानी यांची नावे आहेत. नटवरलाल यांनी अनेक दुकानदारांकडून बनावट धनादेश आणि डिमांड ड्राफ्ट घेऊन लाखो रुपये जमा केले होते.

त्याच्यावर १०० हून अधिक खटले दाखल करण्यात आले होते आणि ८ राज्यांचे पोलिस त्याच्या मागे होते. अखेर त्याला पकडले गेले आणि त्याला ११३ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली परंतु देशातील कोणतीही तुरूंग नटवरलाल यांना रोखू शकला नाही.

तो 8 वेळा देशाच्या विविध तुरूंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला. १९९६ मध्ये जेव्हा तो शेवटचा तुरूंगातून सुटला तेव्हा तो ८४ वर्षांचा होता आणि व्हीलचेअरवर बसून होता. त्याला चालताही येत नव्हते. पोलिसांच्या देखरेखीखाली त्याला कानपूर कारागृहातून नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात आणले गेले.

२४ जून १९९६ रोजी नटवरलाल यांना अखेर पाहिले होते आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला कधी पकडले नाही. नटवरलालचे आयुष्य जसे रहस्यमयी होते, त्याचा मृत्यूही तितकाच रहस्यमयी होता. २००९ मध्ये नटवरलाल यांच्या वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती की २५ जुलै २००९ रोजी त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर प्रलंबित असलेले १०० हून अधिक खटले रद्द करावेत.

दरम्यान, नटवरलाल यांचे बंधू गंगा प्रसाद श्रीवास्तव म्हणतात की नटवरलाल यांचे १९९६ मध्ये निधन झाले आणि त्यांच्यावर रांची येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नटवरलाल किंवा मिथलेश कुमार श्रीवास्तव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘राजा नटवरलाल’ देखील बनला होता ज्यामध्ये परेश रावल आणि इमरान हाश्मी यांनी अभिनय केला होता.

२००४ मध्ये, आज तकने नटवरलालच्या जीवनावर आधारित अनेक भाग त्याच्या क्राइम शो ‘जुर्म’ मध्ये प्रसारित केले होते. त्यामुळे ठग्यांना नटवरलाल हे नाव पडले. अनेकांना ही गोष्ट माहित नव्हती की नटवरलाल हे नाव कसे काय पडले. तर आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.