इसिसच्या दहशतवाद्यांचा खात्मा करणे या महिलेला सोपे वाटते, वाचा कोण आहे ही महिला..

0

आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबद्दल सांगणार आहोत जिने आतापर्यंत अनेक इसिसच्या आतंकवाद्यांचा खात्मा केला आहे. आणि ही महिला दिसायला कोणत्या मॉडेलपेक्षा कमी नाही. पण तिच्या धाडसाने तिला खुप नाव कमवून दिले आहे. कोणालाही न सांगता तिने जो निर्णय घेतला होता तो खुपच अभिमानास्पद होता.

जोआना पलानी असे त्या धाडसी महिलेचे नाव आहे. २०१४ मध्ये डेन्मार्कच्या जोआना पलानीने अचानक आयएसआयएस (इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेविरूद्ध लढण्यासाठी महाविद्यालय सोडले आणि इराककडे आपली पाऊले टाकायला सुरूवात केली. हा निर्णय जोआनासाठी सोपा नव्हता कारण तिने दहशतवाद्यांविरूद्ध लढण्याचा निर्णय घेतला होता.

दुसरे म्हणजे यासाठी तिने आपल्या देशातील सरकारलाही याबद्दल माहिती दिली नाही. वास्तविक जोआना पलानी ही एक डॅनिश मुलगी आहे ज्याने सीरियामध्ये आयएस आणि असदच्या सैन्याविरूद्ध वर्षभरासाठी युद्ध केले आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये डेन्मार्कमध्ये दाखल झाल्यानंतर तिने पीपल प्रोटेक्शन युनिटमध्ये प्रवेश घेतला.

त्यानंतर ती कुर्दिश स्थानिक सरकारी सैन्यात दाखल झाली. पलानी प्रथम इराक, नंतर सिरियाला गेली होती. या कालावधीत, २३ वर्षीय जोआना पलानी हिला सतत धमक्या दिल्या जात होत्या. तिला घरी परत यायचं नव्हतं. तिच्या एका मुलाखतीत पलानी सांगते की सुरुवातीला ती तिच्या निर्णयाबद्दल फारशी गंभीर नव्हती पण माझ्यावर जेव्हा पहिला हल्ला होताच मी पूर्णपणे गंभीर झाले आणि मी ठरवले की आता माग हटायचं नाही.

जोआना पलानीने आपला एक वर्षांचा अनुभव सांगताना सांगितले की, इसिसच्या दहशतवाद्यांचा खात्मा करणे खूप सोपे काम आहे. त्यांच्या मते, इसिसचे अतिरेकी नेहमी बलिदान देण्यासाठी पुढे असतात. तर असादचे सैन्यदल तसे करत नाही त्यांना उत्तम प्रक्षिक्षण देण्यात आले आहे.

या सेनेला किलिंग मशिनसुद्धा म्हणतात, अशी माहिती जोआनाने दिली आहे. सध्या, पलानी डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे गेली आहे. डॅनिश पोलिसांच्या मेलनंतर तिने परत घरी येण्याचे ठरविले होते. दरम्यान, बऱ्याच दिवसांनी घरी परतल्यानंतर कोपेनहेगन पोलिसांना तिचे पासपोर्ट जप्त केले आहे.

परत आल्यानंतर पोलिसांनी पलानीला पुन्हा इराक किंवा सिरियाला जाण्याचा विचार करू नको असे सांगितले आहे. जर तिने तसे केले तर सहा वर्षाची शिक्षा होऊ शकते. मात्र, या निर्णयाविरोधात तू कोर्टात जाऊ शकतेस असा सल्लाही पोलिसांना जोआनाला दिला होता. सिरियाहून परत आल्यानंतर पलानी कोपेनहेगनमधील राजकारणाचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करीत आहेत.

जोआना सोशल मिडीयावरही खुप ऍक्टीव्ह असते. तिच्या अदांवर नेटकरी फिदा आहेत. इतकी सुंदर मुलगी इसिसचा खात्मा करण्यासाठी सैन्यदलात जाऊ शकते याचा कोणी विचारही करू शकत नाही. तिच्या या कामामुळे अनेक मुलींना प्रेरणा मिळाली आहे. तिच्यानंतर अनेक मुलींनी आणि महिलांनी सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेतला आहे. जरी जोआनाला सध्या सैन्यदलात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे तरी तिने आपली जिद्द सोडलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.