जगातील सर्वात हुशार माणूस आईनस्टाईन ९ वर्ष बोलतच नव्हते; कारण समजल्यावर चकीत व्हाल

0

अल्बर्ट आइनस्टाइनचा जन्म झाला तेव्हा त्याचे डोके सामान्य मुलांच्या तुलनेत खुप मोठे होते. त्यावेळी वैद्यकीय विज्ञान इतके विकसित झाले नव्हते की या मोठ्या डोक्यामागील कारण समजू शकेल. आईन्स्टाईन जसे जसे मोठे होऊ लागले तेव्हा अशी परिस्थिती उद्भवली की त्यांना लोक असामान्य मुलगा म्हणून लोक ओळखू लागले होते.

कदाचित तेव्हा आईन्स्टाईनचे डोके मोठे असल्यामुळे लोक त्याला असामान्य म्हणत आहेत असे त्यांच्या पालकांना वाटले असावे. पण नंतर (आईन्स्टाईन यांचे निधन झाल्यानंतर) हे उघड झाले की त्याचे डोके ‘मानवी प्रजाती’ मध्ये एक अद्वितीय डोके होते. आईन्स्टाईन हे लाजाळू मुलांपैकी एक होते.

अगदी वयात येईपर्यंत ते कोणाशीही बोलत नसत. त्यांच्या न बोलण्यावर त्यांचे आई-वडील खूप नाराज असायचे. वयाच्या ४ थ्या वर्षी त्यांनी बोलायला सुरूवात केली होती पण तरीही ते फारसे स्पष्ट बोलले नाहीत. ते अर्धेच बोलायचे किंवा शांत बसायचे. वयाच्या ९ व्या वर्षापासून ते बोलू लागले, ज्याची कहाणी खूप मनोरंजक आहे.

हा किस्सा जेवणाचा आहे. ते जेवणाच्या टेबलावर आई आणि वडिलांसोबत जेवणासाठी बसले होते. अचानक ते म्हणाले की, सूप खूप गरम आहे. हे ऐकून त्याचे आईवडील खूश झाले पण आधी त्यांच्या स्वच्छ आवाजाने त्यांना धक्का बसला. त्यांनी त्यांना विचारले की आतापर्यंत ते का बोलले नाहीत?

त्यावर आइन्स्टाईनचे उत्तर होते आतापर्यंत सर्व काही ठीक होते. आईन्स्टाईन स्वतःही मजेदार होते आणि त्यांच्या बर्‍याच सवयी हसण्यायोग्यही होत्या. त्यांनी मोजे घातले नाहीत कारण त्यांच्या मोज्यामध्ये नेहमी छिद्र व्हायचे. दुसरे कारण म्हणजे त्यांचा असा विश्वास होता की जर एकाने काम होत असेल तर दुसरी वस्तू घालण्याची काय गरज आहे.

बर्‍याच औपचारिक डिनर पार्ट्यांमध्ये ते असे मोजे न घालता जात असत. एकदा, ते व्याख्यानमालेसाठी ऑक्सफोर्डला गेले, परंतु विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोज्यांपेक्षा त्यांच्या मोठ्या केसांवर जास्त लक्ष केंद्रित केले होते. आइन्स्टाईन यांना आपले केस कापायला अजिबात आवडत नव्हते आणि त्यांचे लांब केस पाहून कोणीही याचा अंदाज लाऊ शकते.

इतके महान गणितज्ञ असूनही, त्यांना लोक कमी बुद्धी असलेला किंवा विसरभोळा व्यक्ती म्हणायचे. कारण त्यांना एखाद्याचे नाव तारीख किंवा फोन नंबर लक्षात राहत नव्हता. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटले असेल. शाळेत असताना आईन्स्टाईन यांना मूर्ख मुलांमध्ये गणले जात असे.

विशेषत: आइन्स्टाईनच्या काही शिक्षकांना ते अजिबात आवडले नाहीत कारण ते गणित आणि विज्ञान वगळता प्रत्येक विषयात अयशस्वी ठरले होते. शिवाय शिक्षकांच्या ओरडण्याचाही त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. एकदा त्यांच्या गणिताच्या प्राध्यापकाने त्यांना आळशी कुत्रा असे म्हटले होते.

असे म्हणतात की लहान असताना ते गणितामध्येही कमकुवत होते आणि शिक्षकाने त्यांना गणित शिकवायला नकार दिला होता. मग त्यांच्या आईने त्यांना घरी शिकवायला सुरुवात केली आणि गणिताबद्दल अशी रुची जागृत केली की ते एक महान गणितज्ञ बनले.

आईन्स्टाईन यांच्या निधनानंतर पॅथॉलॉजिस्ट डॉ. थॉमस स्टॉल्त्झ हार्वे यांनी त्यांच्या कुटूंबाच्या संमतीशिवाय आईन्स्टाईन यांचा मेंदू बाहेर काढला होता. त्यांना बाकीच्या डॉक्टरांनी खुप समजावले पण त्यांनी २० वर्षे तो मेंदू परत केला नाही तसाच ठेवला.

२० वर्षांनंतर, आइन्स्टाईनचा मुलगा हंस अल्बर्टच्या परवानगीनंतर त्यांनी त्याचा अभ्यास करण्यास सुरवात केली. हे जाणून आश्चर्य वाटेल, पण आईन्स्टाईन यांच्या मेंदूचे डॉ. थॉमस यांनी २०० टुकले केले होते आणि हे तुकडे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांकडे संशोधनासाठी पाठवण्यात आले होते. यासाठी त्यांना हॉस्पिटलमधून देखील काढून टाकण्यात आले होते.

परंतु या अभ्यासानुसार आइन्स्टाईनच्या मेंदूत बाकीच्या लोकांच्या मेंदूच्या तुलनेत एक असाधारण पेशी रचना होती. म्हणूनच आइन्स्टाईनचा यांचा मेंदू खुप असाधारण विचार करायचा. आईन्स्टाईन यांते डोळेही एका बॉक्समध्ये जपून ठेवले आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.