‘या’ नेत्याला रात्री २ ला उठवून सांगितले होते, की तुम्ही पंतप्रधान झाला आहात…

0

 

माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल भारतीय राजकारणातले ते नेते होते, ज्यांनी कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. त्यामुळे त्यांना राजकारणातील अनेक अडीअडचणींचा सामना पण करावा लागला.

गुजराल देशाचे १२ वे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९१९ अविभाजीत भारतातील पंजाबच्या झेलममध्ये झाला होता. शिक्षण घेत असताना स्वातंत्र्य चळवळी सुरू होत्या त्या चळवळींनी ते चांगलेच प्रभावित झाले होते.

तरुण वयात असतानाच त्यांनी आंदोलनात भाग घेण्यास सुरुवात केली. १९४२ मध्ये झालेल्या भारत छोडो आंदोलनात तर गुजराल यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.

तरुण असतानाच त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले होते. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना लाहोर विद्यार्थी संघटनेचे सदस्य होते. काही काळ त्यांनी पत्रकार म्हणून पण काम केले.१९७१ मध्ये जेव्हा इंदिरा गांधींची सत्ता आली तेव्हा गुजराल यांना माहिती आणि प्रसारणमंत्री बनवण्यात आले.

१९७५ जेव्हा इंदिरा गांधींचे वाद निर्माण झाले होते, तेव्हा त्यांचा मुलगा संजय गांधी हे आपल्या कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेशातुन दिल्लीला आणत होते. त्यावेळी दुरदर्शनवर संजय गांधी यांना कवव्हरेज पाहिजे होते. तेव्हा संजय गांधी यांना गुजराल यांची मदत मागितली होती.

गुजराल यांनी मदत करण्यास थेट नकार दिला होता. त्यामुळे गुजराल यांना पदावरुन काढण्यात आले होते. त्यांच्या ऐवजी विद्याचरण शुक्ला यांना माहिती आणि प्रसारणमंत्री हे पद देण्यात आले होते.

१९८० मध्ये गुजराल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि जनता पक्षात सामिल झाले. १९८० मध्ये जेव्हा वीपी सिंग पंतप्रधान होते, तेव्हा गुजराल विदेशमंत्री होते.

१९९६ मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार बहुमत सिद्ध करु शकले नाही, त्यामुळे फक्त १३ दिवसात ते सरकार पडले होते. तेव्हा सीताराम केसरी यांना सोनिया गांधींच्या सहमतीने त्यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनवण्यात आले.

केसरी यांना वाटत होते की, तेच पंतप्रधान बनतील. त्यामुळे केसरी यांनी विरोधी पक्षाशी भेटीगाठी सुरु केल्या. पण कोणत्याच पक्षाकडून त्यांना समर्थन मिळाले नाही.

कोणत्याच नेत्याचे पंतप्रधान पदासाठी नाव निश्चित केले जात नव्हते, अखेर रात्री इंद्र कुमार गुजराल यांचे नाव पंतप्रधान पदासाठी निश्चित करण्यात आले. जेव्हा गुजराल यांचे नाव निश्चित करण्यात आले, तेव्हा ते झोपलेलेच होते, त्यांना झोपेतुन उठवून ते पंतप्रधान झाल्याचे त्यांना सांगण्यात आले होते.

२१ एप्रिल १९९७ मध्ये गुजराल देशाचे पंतप्रधान झाले होते. पण त्यांचा कार्यकाळ फक्त ११ महिन्यांचाच होता. १९९९ मध्ये निवडणुकीत नामांकन न झाल्याने त्यांनी राजकारणातुन संन्यास घेतला होता.

इंद्र कुमार गुजराल उत्तम राजकारणी तर होतेच, तसेच ते एक कवी पण होते. गुजराल हिंदी, उर्दु आणि पंजाबी भाषांमध्ये निपुण होते. त्यासोबतच त्यांना अनेक भाषांची माहिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.