इंडियन स्नेक मॅन म्हणून प्रसिद्ध आहे हा माणूस, ३० हजारांपेक्षा जास्त सापांचे वाचवलेत प्राण

0

जर आपण पाहिले तर लोक साधारणपणे आपले पोट भरण्यासाठी आणि आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी काम करताना आपण पाहिले आहे आणि हाच त्यांचा छंद बनलेला असतो. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की केरळमधील एका व्यक्तीला सर्वात धोकादायक आणि विषारी साप पाळण्याची आवड आहे.

आज आम्ही तुम्हाला या व्यक्तीबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत ज्या वाचून तुमच्या अंगावर काटा येईल. ४६ वर्षीय सुरेश हा तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील ‘श्रीकरायम’ या छोट्याशा गावातील रहिवासी असून तो ‘इंडियन स्नेक मॅन’ म्हणून ओळखला जातो.

दहावी पास सुरेश गेल्या ३० वर्षांपासून सापांना वाचवण्यासाठी कार्यरत आहे आणि तो राज्यातला सर्वात मोठा सर्प रक्षक म्हणून प्रसिद्ध आहे. तो जेव्हा १२ वर्षांचा होता तेव्हाच त्याने सापाला पकडून अनेकांना आश्चर्यचकित करून सोडले होते. मग ही मालिका अशी चालली की आजपर्यंत त्याने थांबायचं नावच घेतले नाही.

सुरेश हे काम कोणतीही उपकरणे आणि सुरक्षा रक्षकांशिवाय करतो. सुमारे ३० हजारपेक्षा अधिक सापांना वाचवणाऱ्या सुरेशला सुमारे ३०० वेळा विषारी सापांनी चावा घेतला आहे. सर्पांचे विष त्याच्या शरीरात बर्‍याचदा पसरले आहे आणि त्याला ६ वेळा आयसीयूमध्ये दाखल करावे लागले आणि ३ वेळा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

तरीही सुरेश आज सापांसह आयुष्य जगत आहे. ते म्हणतात की, साप बहुतेक गरीब लोकांच्या कच्च्या घरात आढळतात आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता मी त्यांच्याकडून पैसे घेऊ शकत नाही. लोक मला जे काही देतात त्यांना मी आनंदाने स्वीकारतो.

लोकांच्या दारिद्र्य लक्षात घेता मी माझा दर निश्चित केलेला नाही. सुरेशचे साहस पाहता २०१२ मध्ये वन व पर्यावरण मंत्री के. बी. गणेश कुमार यांनी त्यांना सरकारी नोकरीची ऑफर दिली होती पण सुरेशने ही नोकरी नाकारली आणि ते म्हणाले की, जर मी ही ऑफर स्वीकारली तर मी माझ्या मार्गाने समाजाला मदत करू शकणार नाही आणि जर मी योग्य वेळेला उपलब्ध नसलो तर एखाद्या निर्दोश माणसाचा जीव जाऊ शकतो.

२०१३ मध्ये ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांनी केरळ दौऱ्यात सुरेशला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि या आश्चर्यकारक कार्याबद्दल त्यांचा गौरवही केला. निःस्वार्थ समाजाची सेवा करणारे सुरेश यांना सापांचे रक्षक किंवा देवदूत म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा. जर हा लेख आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.