भारतातील या पाच राण्या आपल्या सुंदरतेसाठी होत्या जगप्रसिद्ध, वाचा त्यांच्याबद्दल..

0

भारतातील राजे आणि सम्राटांचा युग कदाचित गेला असेल, परंतु राजांच्या राजघराण्याशी संबंधित कथा आपल्या कित्येकदा ऐकायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशा भारतीय सुंदरांशी ओळख करुन देणार आहोत ज्यांच्या सौदर्यांने त्यांनी अनेकांना त्या काळात भुरळ पाडली होती. या किस्से-कथांपैकी आज आम्ही आपल्याला इतिहासाच्या अशा सुंदर महारण्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याविषयी कदाचित बऱ्याच लोकांना माहित नाही.

हैदराबादची राजकुमारी निलोफर (१९१६ – १९८९)
निलोफर अनेक कारणांमुळे एक अष्टपैलू राजकुमारी मानली जात होती. जगातील सर्वात सुंदर १० महिलांमध्ये तिची गणना केली जाते. या कारणामुळे तिला बर्‍याच चित्रपटांच्या ऑफर देखील मिळाल्या. राजकुमारी निलोफर यांनी नर्सचे प्रशिक्षण घेतले आणि हैदराबादमध्ये मुले आणि महिलांसाठी एक रुग्णालय स्थापन केले. ज्या राजकुमारीवर तिच्या राज्यातील अनेक तरूण मुले फिदा तिने कधीच लग्न केले नाही. त्यामुळे तिला मुलेही नव्हती व ती कधीच आई बनली नाही. १८८९ मध्ये पॅरिसमध्ये त्यांचे निधन झाले.

राजमाता गायत्री देवी (२३ मे १९१९ – २९ जुलै २००९)
२००९ मध्ये वोग मॅगझिनने महाराणी गायत्री यांना ६० च्या दशकातली ‘जगातील सर्वात सुंदर स्त्री’ असा खिताब दिला होता. गायत्री देवीने १९३९ ते १९७० या काळात महाराणी म्हणून जयपूरवर राज्य केले. युरोपमध्ये शिक्षण घेतलेली गायत्री देवी तिच्या अफाट सौंदर्यामुळे तरुणांसाठी फॅशन आयकॉन ठरली होती. ऑटोमोबाईलची आवड असलेल्या गायत्री देवीने भारतातील पहिल्या मर्सिडीज-बेंझ डब्ल्यू १२६ ची ऑर्डर दिली होती.

इंदिरा राजे बडोदा (१९ फेब्रुवारी १९९२ – ६ सप्टेंबर १९६८)
कूच बिहारची राणी इंदिरा राजे तिच्या सौंदर्य आणि परोपकारासाठी परिचित होती. तिने ग्वाल्हेरच्या सिंदियाशी लग्न केले होते. परंतु राजेशाही आणि आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तिने कूचबिहारचा राजकुमार जितेंद्र याच्यासोबत पलायन केले होते. ते दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. क्वीन इंदिराचा खुप राजेशाही थाट होता. प्रिन्स जॉर्जबरोबर त्यांचे प्रेमसंबंध होते अशा चर्चा त्या काळी रंगल्या होत्या.

सीता देवी बडोदा (१२ मे १९१७ – १५ फेब्रुवारी १९८९)
सीता देवी बडोदा भारताच्या इतिहासातील सर्वात सुंदर राणीची कन्या होती. वायूरच्या जमीनदारासोबत लग्न केले होते. जमीनदारासोबत लग्न केल्यानंतर त्यांनी ३ मुलांना जन्म दिला. पण नंतर १९४३ मध्ये त्या महाराणा प्रताप सिंह गायकवाड यांच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्या नवऱ्याला सोडून दिले.

सीता देवी कपूरथला (१९१५ – २००२)
सीता देवी या त्यांच्या काळातील सर्वात सुंदर महिला होत्या असे म्हटले जाते. जमीनदाराच्या घरात जन्मलेल्या सीता देवी यांचे वयाच्या १३ व्या वर्षी कपूरथळाच्या महाराजांच्या धाकट्या मुलाशी लग्न झाले होते. वयाच्या १९ व्या वर्षी सीता देवी यांना वोग मासिकाने “जागतिक देवी” ही पदवी दिली होती. त्यांची गणना जगातील ५ सर्वात सुंदर महिलांमध्ये केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.