एका झोपडपट्टीत राहणारा लहान चिमुकला कसा बनला हॉलिवूड स्टार, वाचा त्याची संघर्षकथा

0

कधी कोणाचे भाग्य बदलेल सांगता येत नाही. असेच ८ वर्षीय सनी पवारसोबत घडले होते जो आज हॉलिवूडचा मोठा स्टार बनला आहे. हॉलिवूडचे मोठे तारे त्याचे चाहते आहेत आणि मिडीया त्याच्या मागे मागे फिरत असते पण या चकाकीपासून दूर काही वर्षांपुर्वी सनी आपल्या कुटूंबासह मुंबईच्या झोपडपट्टीत राहत होता.

काळ कधी व कोठे बदलतो हे कोणालाच माहिती नसते. मुंबईतील कल्याणजवळ एका लहान झोपडपट्टीत राहणारा सनी पवार शासकीय एअर इंडिया मॉडर्न स्कूलमध्ये शिकतो. एके दिवशी ‘लायन’ ची कास्टिंग टीम त्याच शाळेत आली आणि त्या दोन हजार मुलांच्या गर्दीत सनीला त्यांनी चित्रपटासाठी निवडले.

जेव्हा सनीला हा चित्रपट आला तेव्हा सनीला इंग्रजी कसे बोलायचे ते माहित नव्हते. जरा विचार करा की ज्याला इंग्रजी येत नाही, त्याने फक्त इंग्रजी चित्रपटातच काम केले नाही तर निकोल किडमॅन सारख्या मोठ्या स्टार्सचा तो मित्र बनला आहे. तसेच संपूर्ण हॉलीवूडने त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी आतुर होते आणि सगळेजण त्याच्या अभिनयाची प्रशंसा करत होते हे चमत्कारापेक्षा कमी नाही.

सनीच्या वडिलांना दरमहा दहा हजार रुपये पगार मिळतो. अशा परिस्थितीत त्याच्या घरची परिस्थिती खुप चांगली नव्हती. आपला मुलगा हॉलिवूड चित्रपटात काम करेल हे जेव्हा वडिलांना कळले तेव्हा त्यांनी आपल्या मुलाच्या पंखांना बळ दिले. एकीकडे या चित्रपटाची कहाणी ऐकून सनी थोडा घाबरला असताना, सनीच्या वडिलांनी त्या काळात त्याला धैर्य दिले आणि संपूर्ण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मुलासमवेत राहिले.

‘लायन’ चित्रपटाने सनीला एक रात्रीत स्टार बनविले. सनीला त्याची कथा समजण्यास बराच वेळ लागला. पण आता तो जेथेही जातो त्याच्यासोबत एक माणूस असतो जो त्याला प्रश्न समजावून सांगेल आणि जे उत्तर सनी देईल ते तो प्रेक्षकांना समजावून सांगेल. सनी हिंदीतूनच प्रश्नांची उत्तरे देतो.

ऑस्कर अवॉर्ड दरम्यान झळकलेला हा मुलगा ज्याचे फॅन्स हॉलिवूडचे मोठेमोठे स्टार्स होते त्याला त्याच्या आईवडिलांना साधे रेड कार्पेटवर सुद्धा पाहता आले नाही. कारण त्यांच्या घरात केबलचे कनेक्शन खराब झाले होते त्यामुळे त्यांना आपल्या मुलाला पाहता आले नाही हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

वृत्तानुसार, घरात केबल कनेक्शन नसल्याने त्याचे कुटुंब ऑस्करमध्ये त्याला पाहू शकले नाही. पण त्यांना आनंद आहे की त्यांचा मुलगा अशा मोठ्या स्टार्समध्ये पोहोचला आणि लोकांनाही तो खुप आवडतो आहे. त्यानंतर सनी घरी आला आणि त्याने ऑस्करदरम्यान काय काय घडले हे आपल्या आई वडीलांना सांगितले. हे सांगताना त्याचा आनंदच वेगळा होता.

सनीने आणखी एका ‘लव सोनिया’ चित्रपटात अभिनय केला आहे. लायनचे रायटर ल्यूक डेविस हे सनीचे खुप मोठे फॅन झाले आहेत. ते म्हणाले की सनी एक खुप मोठा स्टार होऊ शकतो आणि मी त्याच्यासोबत आणखी चित्रपट बनवणार आहे. त्यांना सनीचा अभिनय खुपच आवडला होता.

सनीने आपल्या आई वडीलांना आनंद मिळवून दिला आणि हे ही दाखवून दिले की जे लोक झोपडपट्टीत राहतात त्यांचे हे नशीब नाहिये. जर त्यांनी ठरवले तर ते त्यांचे नशीब बदलू शकतात. नशीबाला दोष देण्यात काहीच फायदा नाही. जर तुमच्या नशीबात काहीतरी चांगले होणार असेल तर ते होणारच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.