सैम मानेकशॉ: भारतीय सेनेचा तो नायक ज्याला इंदिरा गांधीसुद्धा घाबरायच्या

0

आज आम्ही तुम्हाला अशा एका नायकाबद्दल सांगणार आहोत ज्याला दुश्मन तर घाबरायचेच पण स्वता इंदिरा गांधीसुद्धा त्याला घाबरायच्या. ते जर आज जीवंत असते तर ते १०७ वर्षांचे असते. त्यांचे नाव आहे सैम मानेकशॉ. त्यांनी १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी पाकिस्तानचा खुप वाईट प्रकारे पराभव झाला होता आणि बांग्लादेशचा जन्म झाला होता.

ते भारतीय सेनेचे पहिले ५ स्टार जनरल होते. तसेच ते पहिले ऑफिसर होते ज्यांना सेनेमध्ये फिल्ड मार्शलच्या रॅंकला प्रोमोट केले गेले होते. त्यांची लोकप्रियता वाढली होती की त्यावेळी इंदिरा गांधीसुद्धा त्यांना घाबरत होत्या.

एप्रिल १९७१ मध्ये इंदिरा गांधीजींना सैम यांना विचारले की भारत पाकिस्तानशी युद्ध करण्यास तयार आहे का? तेव्हा सैम म्हणाले की जर आता पाकिस्तानशी युद्ध केले तर आपण तयार आहोत. त्यानंतर इंदिरा गांधी त्यांच्यावर नाराज झाल्या होत्या.

त्यांना नाराज झालेले पाहून सैम मानेकशॉ यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आणि म्हणाले की, मॅडम प्राईम मिनिस्टर तुम्ही काही बोलण्याच्या आधी मी तुम्हाला विचारतो की, तुम्ही माझा राजीनामा मानसिक किंवा शारिरीक कोणत्या आधारावर स्विकार करणार? त्यानंतर इंदिरा गांधी यांनी त्यांचा राजीनामा घेण्यास नकार दिला त्यांचाच सल्ला घेऊन पाकिस्तानशी युद्ध करण्यासाठी तारीख ठरवली.

त्यानंतर जवळपास सात महिन्यानंतर त्यांनी पुर्ण तयारी करून बांग्लादेशबरोबर युद्ध केले. युद्धाच्या आधी जेव्हा इंदिरा गांधीनी पुन्हा विचारले की सगळी तयारी झाली आहे का? त्यावर सैम म्हणाले की मी नेहमी तयार आहे, स्वीटी. वीके सिंग यांनी सैम यांच्याशी निगडीत एक किस्सा लिहीला आहे.

१९७१ च्या युद्धात ९० हजार पाकिस्तानी लोकांना बंदी बनवण्यात आले होते. त्यामध्ये बंदी असलेल्या लोकांच्या जेलमध्ये येण्यासाठी त्यांनी पाकिस्तानी सुबेदार मेजरला परवानगी मागितली आणि मगच आत आले. बंदी बनवलेल्या सैनिकांना कोणीच इतकी इज्जत दिली नव्हती.

पाकिस्तानच्या सुबेदार मेजरने पाहिले की पुढे कोणच नव्हते फक्त सैम मानेकशॉ उभे होते. सैम तेथे त्यांची व्यवस्था कशी केली गेली आहे हे पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर सैम यांनी पाकिस्तानी विधवा महिलांना धीर दिला. त्याच्यासाठी बनवले गेलेले जेवण त्यांनी खाल्ले.

पाकिस्तानी लोकांसोबत ते खुप गप्पा मारायचे. जेव्हा सैम जायला निघाले तेव्हा पाकिस्तानी सुबेदार मेजरने त्यांना काहीतरी बोलण्याची परवानगी मागितली. तेव्हा पाकिस्तानी मेजर म्हणाला की, मला आज कळाले की भारत युद्ध का जिंकला. तुम्ही तुमच्या सैनिकांचे खुप चांगल्या प्रकारे काळजी घेत असाल.

ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला भेटायला आला तसं तर आम्ही आमच्या सैनिकांनासुद्धा भेटायला जात नाही. ते तर स्वताला खुप मोठे समजतात. सैम मानेकशॉ असे व्यक्ती होते ज्यांचे दुश्मनांसोबतही चांगले संबंध होते. १९७१ च्या युद्धाच्या वेळी इंदिरा गांधीना वाटले की, सैम मानेकशॉ सैन्याच्या मदतीने तख्तापालट करणार आहेत.

त्यानंतर सैम डायरेक्ट इंदिरा गांधीकडे गेले आणि म्हणाले, मॅडम, तुमचे नाक खुप मोठे आहे. माझे नाकसुद्धा मोठे आहे पण मी दुसऱ्यांच्या प्रकरणात माझे नाक खुपसत नाही. त्यांचा अजून एक किस्सा खुप फेमस आहे. १९४२ मध्ये जपानच्या युद्धाच्या वेळी त्यांच्या पायाला ७ गोळ्या लागल्या होत्या.

त्यानंतरही त्यांच्या धाडसामध्ये काहीच बदल झाला नव्हता. जेव्हा त्यांना डॉक्टरांनी विचारपुस केली तेव्हा ते डॉक्टरांना म्हणाले की, मला गाढवाने लाथ मारली आहे. एकदा त्यांनी गोरखा रेजिमेंटची स्तुती केली होती. ते म्हणाले की, जर तुम्हाला कोणी म्हणाले की मी मृत्युला घाबरत नाही तर तो माणूस एकतर खोटं बोलतोय किंवा तो गोरखा आहे. त्यांचे करिअर ब्रिटीश इंडियन आर्मीसोबत सुरू झाले होते. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी ५ युद्धे लढली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.