..त्यावेळी नेहरूसांठी स्पेशल विमानातून मागवण्यात आली होती खास सिगरेट, वाचा पुर्ण किस्सा

0

राजकारणाच्या इतिहासात अनेक नेत्यांच्या संबंधित कथा आजच्या काळातही चर्चेचा विषय राहिल्या आहेत. जरी ते मोठेमोठे नेते आपल्याला सोडून गेले असतील पण त्यांच्या कथा नेहमी लक्षात राहतात. अशा बर्‍याच कथा आहेत पण आपल्या भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे किस्से खुप प्रसिद्ध आहेत.

राजकीय वर्तुळात या कथांबद्दल प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, परंतु या कथा नेहमीच सर्वसामान्यांसाठी मनोरंजक असतात. असाच एक किस्सा जवाहरलाल नेहरूशी संबंधित आहे. चला आपण संपुर्ण किस्सा जाणून घेऊया. नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू हे एक प्रख्यात वकील होते.

ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते देखील होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव स्वरूप राणी होते. त्या काश्मिरी ब्राह्मण होत्या आणि त्यांनी १८८६ मध्ये त्यांनी मोतीलाल नेहरू यांच्याशी लग्न केले होते. जवाहरलाल नेहरू लहानपणापासूनच वाचन-लेखनात हुशार होते.

जवाहरलाल नेहरू यांनी सुरूवातीचे आयुष्य अलाहाबादमध्ये घालवले. ते लहानपणापासूनच हुशार होते. वयाच्या १५ व्या वर्षी नेहरूंना इंग्लंडच्या हॅरो स्कूलमध्ये अभ्यासासाठी पाठवले गेले. हॅरोहून ते केंब्रिजमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये गेले आणि तेथे त्यांनी तीन वर्ष अभ्यास करून नैसर्गिक विज्ञान विषयात पदवी संपादन केली.

लंडनमधील इनर टेंपलमध्ये दोन वर्षे घालवल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. भारतात परतल्यानंतर चार वर्षांनी म्हणजे १९१६ मध्ये नेहरूंचे कमला कौल यांच्याशी लग्न झाले. कमला दिल्लीमध्ये स्थायिक झालेल्या काश्मिरी कुटुंबातील होत्या.

मोतीलाल नेहरू १९१९ आणि १९२० मध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. १९१९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधींबरोबर सामिल झाले. ते गांधीजींसोबत बर्‍याच ठिकाणी गेले. पंडित जवाहरलाल नेहरू ९ वेळा तुरुंगात गेले. नेहरू यांना ११ वेळा नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

प्रत्येकजण आपल्या एका वेगळ्या शैलीमुळे किंवा वेशभुषेमुळे प्रसिद्ध होता. त्यांच्या उंच कॉलरच्या जॅकेटच्या निवडीमुळे नेहरू जॅकेट फॅशन आयकॉन बनले. १९४७ मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. संसदीय सरकारची स्थापना आणि निर्बंधक परराष्ट्र व्यवहार धोरण जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले.

पंडित नेहरूंनी मध्य प्रदेशचे नाव ठेवले. तत्कालीन नेते शंकर दयाल शर्मा यांच्याशी त्यांचे जवळचे नाते होते. यामुळे नेहरू भोपाळ येथे वारंवार येत असत. पंतप्रधान असताना त्यांनी अनेकवेळा भोपाळला भेट दिली आहे. भोपाळवर त्यांचे खूप प्रेम होते. भोपाळचे नैसर्गिक रंग आणि हवामान त्यांना आवडायचे.

भोपाळमध्ये त्यांच्या नावावर बरीच संस्था, रुग्णालये, शाळा आहेत. मध्य प्रदेशातील नेहरूंच्या जीवनाशी संबंधित एक विशेष किस्सा देखील आहे. एकदा नेहरू भोपाळच्या दौर्‍यावर होते, तेव्हा त्यांनी राजभवनला भेट दिली होती. तेव्हा त्यांची सिगार संपलेली होती.

दरम्यान, भोपाळमध्ये नेहरूंच्या ५५५ ब्रॅंडच्या सिगरेटचे पाकीट कोठेच सापडले नाही. नेहरू यांना जेवण केल्यानंतर सिगारेट ओढण्याची सवय होती. कर्मचार्‍यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी भोपाळ ते इंदूर एक विशेष विमान पाठवले. त्या विमानाने सिगरेट मागवण्यात आली होती.

एक व्यक्ती सिगरेटची काही पाकिटे घेऊन इंदूर विमानतळावर आला आणि विमान पॅकेट घेऊन परत भोपाळला आले. राजभवनाच्या अधिकृत संकेतस्थळावर या रोचक किस्स्याचा उल्लेख आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.