… म्हणून इम्रान हाश्मीने घेतला ऑनस्क्रिन कधीही किस न करण्याचा निर्णय

0

 

 

इम्रान हाश्मीने त्याच्या अभिनयाच्या जोरावर जगभरात ओळख निर्माण केली आहे. तो त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या चित्रपटातल्या किसिंग सिनमुळेही चर्चेत असतो.

आता मात्र इम्रान हाश्मीने कधीही ऑनस्क्रिन किस करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही काळापासून मी किसिंग सीन देणारे चित्रपट करत नाही, त्यामुळे लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

आजपर्यंत मी नेहमीच स्क्रिप्टनुसार काम केले आहे, पण आता पुढे येणाऱ्या चित्रपटांमुळे सिरियल किसरचा टॅग हटेल, असे इम्रान हाश्मीने म्हटले आहे. चला तर मग आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल…

इम्रान हाश्मीचा जन्म २४ मार्च १९७९ मध्ये झाला होता. त्याचे पुर्ण बालपण मुंबईमध्येच गेले. मुंबईतूनच शिक्षण पुर्ण केले. आपल्या अभिनयाच्या जोरावर २००३ मध्ये त्याला पहिला चित्रपट मिळाला, तो म्हणजे फुटपाथट.

मर्डर, तुमसा नहीं देखा, आशिक बनाया आपने, अशा चित्रपटांमधून त्याला किसर बॉयचा टॅग लागला. त्यावेळी अनेक अभिनेता चित्रपटांमध्ये किसिंग घाबरायचे कारण त्यावेळी त्यांच्या अशा काही सिन्समुळे हीरोच्या इमेजवर चुकीचा प्रभाव पडायचा.

असे असताना इम्रानने चित्रपटांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्याने चित्रपटात किसिंग सिन्स दिले होते. तसेच त्याने त्याच्या प्रत्येक चित्रपटांमध्ये चांगला अभिनय केला आहे.

कलयुग, गँगस्टर, राज २, आणि आवारापण सारख्या गंभीर भुमिकेमुळे त्याने त्याच्यावर लागलेला किसर बॉयचा टॅग हटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरच त्याला बॉलिवूडमध्ये एक उत्तम अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आहे.

आता इम्रान हाश्मीचा आणि जॉन अब्राहमचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. याशिवाय इम्रान हाश्मीचे पुढे टायगर-३, चेहरे, एज्रा हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.