या शेतीला ना मातीची गरज आहे, ना खताची, तरी मिळतेय लाखोंचे उत्पन्न

0

 

शेतकरी नेहमीच शेतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करुन शेतीत लाखो रुपये कमवत असतात, पण असे म्हणतात कि शेती करण्यासाठी तुमच्याकडे जमीन असायला हवी आणि ती सुद्धा सुपीक असायला हवी, पण आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने सुपीक जमिनीच्या समजाला खोटे ठरवले आहे.

उत्तराखंडच्या पौडी गढवालच्या बदलपुर चिन्वाडी गावात राहणाऱ्या या तरुणाचे नाव गणेश बिष्ट असे आहे. गणेशने शेतीमध्ये असा प्रयोग केला आहे, कि तो घराच्या छतावरच शेती करत असून तो जी शेती करतोय त्याला ना मातीची गरज आहे ना जास्त पाण्याची गरज आहे.

गणेशने इस्त्राईलमध्ये केली जाणारी हायड्रोपॉनिक शेती घराच्या छतावर केली आहे. ही शेती घराच्या छतावर किंवा फ्लॅटवर करता येऊ शकते. ही शेती करण्यासाठी जास्त पाण्याची गरज पडत नाही सोबतच ही शेती करण्यासाठी मातीची गरज पडत नाही.

गणेश ही शेती करुन वेगवेगळ्या भाज्यांची लागवड केली आहे, या भाज्यांची विक्री करुन तो लाखो रुपयांची कमाई करत आहे. गणेश आधी दिल्लीच्या लेबर मिनिस्ट्री काऊंसिल सीआयडीसीमध्ये काम करत होता, त्याने तिथे २००२ ते २०१४ पर्यंत काम केले होते.

अशात त्याने उत्तराखंडमध्ये राहून काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. त्याला हरियाणात जाण्याची संधी मिळाली, तिथे त्याला ड्रिप इरिगेशन आणि हायड्रोपॉनिक शेतीबद्दल माहिती मिळाली. त्याने लगेच त्या गोष्टीवर अभ्यास सुरु केला.

पाहता पाहता त्याने ही शेती सुरु केली असता त्याचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. आता या शेतीतून तो लाखोंची कमाई करत आहे. तसेच तो गणेश कृषी विभागसोबत मास्टर ट्रेनर म्हणून सुद्धा काम करत आहे.

गणेश ही शेती करताना बाजारात जास्त भाव मिळणाऱ्या भाज्यांचेही उत्पन्न घेतो. ज्याचा उपयोग फाईव्ह स्टार केला जातो. गणेशने आपल्या बागेत ब्रोकली, ऑरगेनो, चाइप्स आणि पार्सलसारख्या भाज्यांची लागवड केली आहे.

हायड्रोपॉनिक भाज्या हे पुर्ण ऑर्गेनिक असतात. तसेच या पद्धतीची शेती केल्याने भाज्यांची वाढ ही साध्या शेतीच्या मानाने जास्त वेगाने होते. विशेष म्हणजे ही शेती करताना खताचीहीगर पडत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.