भावाने अशी कचरापेटी तयार केलीय की कचरापण नाय दिसणार आणि दुर्गंधीपण नाय येणार

0

 

भारतात आपण नेहमीच नवनवीन देशी जुगाड बघत असतो. त्यांची अनेकदा सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगते. आता असाच काहीसा प्रकार कर्नाटकमध्ये पहायला मिळाला आहे.

कर्नाटकच्या हुबळी गावात राहणाऱ्या माणसाने आता एक असा डस्टबिन तयार केला आहे, कि जो दिसायला पुर्ण पोस्टबॉक्ससारखा आहे. डस्टबिन तयार करणाऱ्या या माणसाचे नाव विश्वनाथ पाटील असे आहे.

विश्वनाथ पाटील यांनी पोस्ट बॉक्ससारखी दिसणारी कचरापेटी तयार केली आहे. विशेष म्हणजे या डस्टबिनजवळ तुम्हाला ना कचरा दिसून येईल ना त्याची दुर्गंधी येईल.

विश्वनाथ पाटील हे ‘स्वच्छ, स्वस्थ ट्रस्ट’ नावाचे ट्रस्ट चालवतात. त्यांनी असा डस्टबिन तयार केला आहे, जो दिसायला पुर्ण पोस्टबॉक्ससारखाच आहे. जेव्हा पण कोणी यात कचरा टाकेल, तर तो कचरा त्याच्या खाली तयार केलेल्या टाकीत जाईल.

त्यामुळे ना तो कचरा बाहेर येईल ना, त्या कचऱ्याचा दुर्गंध येईल. या डस्टबिनला अंडरग्राऊंड डस्टबिन म्हणून ओळखले जाते. तसेच विश्वनाथ यांनी जागोजागी स्वच्छता रहावी, यासाठी ते नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात.

मी डस्टबिनपासून एक गाडी तयार केली आहे, जी ऑटोमॅटीक आहे, तसेच ती लीकप्रुफ आहे. या डस्टबिनला अशाप्रकारे डिझाईन करण्यात आले आहे की याच्याबाहेर तुम्हाला कधीही कचरा दिसणार नाही, असे विश्वनाथ पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच या अंडरग्राऊंड डस्टबिनला वेळोवेळी साफ केले जाते. तसेच हा कचरा बाहेर काढताना विशेष लक्ष दिले की तो बाहेर पडू नये, यासर्व गोष्टी ऑटोमॅटीक सिस्टीमद्वारे केल्या जातात, असेही विश्वनाथ पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच याव्यतिरिक्त विश्वनाथ पाटीय यांनी एक कचरा व्हॅन तयार केली आहे. या व्हॅनच्या साहाय्याने कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावता येते. या व्हॅनमुळे कचरा हाताने उचलण्याची गरज पडत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.