ताजमहाल बांधण्यासाठी शाहजहांने किती खर्च केला? त्याने कारागिरांना किती पैसै दिले होते?

0

ताजमहालच्या बांधकामाविषयी अनेक आख्यायिका आहेत, काही सकारात्मक तर काही नकारात्मक. कोणीही काहीही म्हणले तरी आपण हे नाकारू शकत नाही की प्रेमाची निशाणी म्हणून उभारण्यात आलेला ताजमहाल ही सर्वात सुंदर वास्तु आहे. जगातील अनेक पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी दरवर्षी येत असतात.

कदाचित हेच कारण आहे की कोणी कितीही मोठा व्यक्ती किंवा पर्यटक असला तरी त्याला ताजमहाल पाहण्याचा मोह आवरत नाही. मग ते अमेरिकेचे अध्यक्ष असो किंवा इतर कोणत्या देशाचे प्रत्येकजण ताजमहाल पाहण्यासाठी भारतात येतो. ताजमहालच्या सौदर्यांने अनेक लोक मोहून जातात.

अनेक जण त्याची प्रशंसा करतात पण त्याला ज्या कारागिराने बांधले त्यांच्याबद्दल कोणालाच जास्त माहिती नाही. प्रत्येकाला माहित आहे की मुघल बादशाह शाहजहांने आपल्या बेगम मुमताजच्या स्मरणार्थ ताज महाल बांधला होता. पण तुम्हाला माहित आहे की शाहजहांला ही सुंदर इमारत बांधण्यासाठी काय बलिदान द्यावे लागले होते.

जगाच्या सात आश्चर्यांपैकी ताजमहाल बनवण्यामागे सिव्हिल इंजिनिअरिंगच नाही तर त्यामध्ये शाहजहांच्या उत्कटतेचा खुप मोठा हात होता. तज्ञांचा असा विश्वास आहे की ताजमहाल बांधण्याच्या नादात त्याने सर्व छंद सोडून दिले होते त्याचे एकच लक्ष होते ते म्हणजे ताजमहाल.

त्याने ताजमहालच्या बांधकामात गुंतलेल्या मजुरांना व कामगारांना मोबदल्यापेक्षा पाचपट अधिक दिले मानधन दिले होते. ताजमहाल बांधण्यासाठी वीस हजार मजुरांना कामावर ठेवले होते. या मजुरांच्या २२ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ते आश्चर्यचकित झाले होते.

पर्शियातून ताजमहाल तयार करण्यासाठी बोलावलेल्या तज्ञांना दरमहा पंधराशे रुपये एवढा मोबदला देण्यात येत होता, जो सुमारे ३६१ वर्षांपूर्वी देण्यात येत होता. त्यावेळी ही रक्कम खुप जास्त होती. एवढेच नव्हे तर मजुरांना त्यावेळी देण्यात येणाऱ्या मोबदल्यापेक्षा ५ पट अधिक पैसेही दिले गेले होते.

ही जी किंमत होती ती मजूरांनी जेवढी सांगितली होती तेवढी देण्यास शाहजहां तयार होता आणि त्याने सगळ्या मजूरांना त्यांनी जेवढी रक्कम मागितली होती तेवढी देऊन टाकली होती जी खुप जास्त होती. सर्वात कमी स्तरावरील कामगारांना जो मोबदला देण्यात येणार होता त्याच्या बदल्यात त्यांना ५ ते १० पट अधिक मोबदला देण्यात आला होता.

कारागिरांना त्यांच्या कौशल्यासाठी योग्य किंमत दिली जाईल तेव्हा ते उत्कटतेने काम करतील आणि त्याचा परिणामही या निकालावर दिसून आला असे शाहजहांचे मत होते. त्यावेळी या सुंदर इमारतीच्या बांधकामासाठी ४ कोटी ११ लाख ४८ हजार रुपये खर्च आला.

शाहजहांची ताजमहाल बांधण्याची आवड इतकी जास्त होती की त्यासाठी त्याने आपले सर्व छंद सोडून दिले होते. त्याला दुसरे काहीच दिसत नव्हते. तो मुमताजच्या प्रेमात वेडा झाला होता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.