डॉ. पेयोच्या नावाने प्रसिद्ध आहे हा घोडा, कॅन्सरपिडीत रूग्णांचे दु:ख करतो दूर

0

आज आम्ही तुम्हाला एका घोड्याची गोष्ट सांगणार आहोत ज्याचे नाव पेयो आहे. आणि हो तो घोडा एक डॉक्टर आहे. फ्रांसमध्ये कॅलिस हॉस्पिटलमध्ये कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रूग्णांना भेटण्यासाठी डॉ. पेयो रोज येत असतात.

डॉ. पेयो माणूस नाही तर एका घोड्याचे नाव आहे. या घोड्याला खासकरून रूग्णांची सेवा करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. रूग्णांचे दुख कमी करण्यासाठी डॉ. पेयो खुप प्रसिद्ध आहेत. पेयो १५ वर्षांचा आहे.

पेयो आपल्या पायांच्या इशाऱ्याने सांगतो की त्याला कोणत्या रूग्णाला भेटायचे आहे आणि त्यांच्याबरोबर किती वेळ घालवायचा आहे. तेथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पेयोला कळते की रूग्णाला कॅंसर आहे की ट्युमर.

मेटास्टॅटीक कॅंन्सरने ग्रस्त असलेल्या २४ वर्षांच्या मारिन यांचा मुलगा जेव्हा त्यांना भेटायला आला तेव्हा तो पेयोलासुद्धा बरोबर घेऊन आला. मारिन म्हणाल्या की, पेयो आणि मुलाला पाहून माझे दुख निघून गेले.

त्याच हॉस्पिटलमध्ये ६७ वर्षीय डॅनियल यांनी जानेवारीमध्ये शेवटचा श्वास घेतला होता. पेयो त्यांचा खुप जवळचा मित्र बनला होता. त्यांना टर्मिनल कॅंन्सर होता आणि त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांच्या अंतिम संस्कारात पेयोसुद्धा उपस्थित असला पाहिजे.

त्यांच्या निधनानंतर जेव्हा त्यांची अंतयात्रा निघाली होती तेव्हा पेयोच्या डोळ्यातसुद्धा पाणी आले होते. असे आणखी बरेच किस्से आहेत. तेथील डॉक्टर हसन यांनी सांगितले की, पेयो आणि मी आम्ही दोघे आमचा बराचसा वेळ रूग्णांसोबतच घालवतो.

हॉस्पिटल प्रशासनाची परवानगी घेऊन आम्ही रूग्णांच्या जवळ जातो. आम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवतो. तेथील बरेच रूग्ण पेयोला खुप प्रेम करतात. पेयोसुद्धा त्यांना मोठ्या आदराने आणि आनंदाने प्रतिक्रीया देतो.

अशा पद्धतीने आम्ही रूग्णांचे दुख दूर करण्याचा प्रयत्न करतो. पेयो आता खुप फेमस झाला आहे. कारण जो आनंद पेयो रूग्णांना देतो तो आनंद त्यांना त्यांचे नातेवाईकही देत नाहीत. यावरून समजते की प्राण्यांमध्येही माणुसकी असते. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा आणि जर आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.