अरे वा! घरकाम करणारी कलिता लढवणार आमदारकीची निवडणूक, धुणी-भांडी केल्यानंतर घेते प्रचारसभा

0

आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबद्दल सांगणार आहोत जी महिला आमदारकीला उभी राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे? तुम्हाला वाचून अभिमान वाटेल की ही महिला एक घरकामगार महिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक ८ व्या टप्प्यात २७ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत होणार आहे. पक्षांच्या अनेक जागांवर उमेदवार उभे राहणार आहेत. उमेदवारांनी निवडणूकीत यश मिळवण्यासाठी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे.

त्यातच आऊसग्राम विधानसभा जागेसाठी घरकाम करणाऱ्या कलिता माझी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांना प्रचार करताना घरकामही सांभाळावं लागत आहे. कलिता डोमेस्टिक हेल्पर म्हणजे घरकाम करून पोट भरणाऱ्या एक महिला आहेत.

आपल्या निवडणूक प्रचाराला जाण्याच्या आगोदर त्या घरातील सगळी कामे करून जातात. पण त्यांना यामध्ये अडचणी येत असल्याने त्यांनी आपल्या मालकाकडे एक महिन्याची सुट्टी मागितली आहे. बर्डवान जिल्ह्यातील एक गरीब कुटुंबातील कलिता मांझी आहेत.

आउसग्राम या जागेतून त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली तेव्हा माझे जीवनच बदलून गेले. जगातील सर्वात मोठी पार्टी असलेल्या भाजपने त्यांना उमेदवार घोषित करून टाकलं.

जर कलिताने निवडणूक जिंकली तर ती आउसग्रामची आमदार होईल व विधानसभेतही बसेल. कलितासाठी ही निवडणूक लढवणे हे काम सोपे नाही. त्यांना जर निवडणूक जिंकायची असेल तर त्यांना अन्य पक्षातील उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे.

सर्वात आधी ती सगळ्या लोकांच्या घरात जाऊन आधी काम संपवते आणि मग निवडणूक प्रचाराला जाते. आता सध्या त्यांनी आपल्या कामातून मालकांना विचारून १ महिन्याची सुट्टी घेतली आहे.

कलिताने सांगितले की, घरातील परिस्थिती बिकट असल्यामुळे तिला जास्त शिक्षण घेता आले नाही. तसेच ती असेही म्हणाली की जर ती निवडणूक जिंकली आणि आमदार झाली तर गरीब मुलांना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

कलिता ही आता भाजपची सक्रिय सदस्य आहे आणि तिने नुकतीच पंचायत समितीची निवडणूकही लढवली आहे. तिच्या परिसरातील अनेक लोक कलिताच्या पाठीशी उभे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.