घरी बसुन मोती उगवणारा माणूस, बघा कशी करतोय लाखोंची कमाई

0

आपण आधीपासुन ऐकत आलोय की, मोती समुद्रातून मिळतात. पण आता प्रत्येक क्षेत्रात आधुनिकरण होत चालले आहे. आता काही लोक मोत्यांची शेती करताना पण दिसून येत आहे.

आज आपण एका अशा शेतकऱ्याची गोष्ट जाणून घेणार आहोत, जो घरी बसून मोतीची शेती करतोय. इतकेच नाही तर हि शेती करुन हा शेतकरी महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.

केरळमध्ये राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव केचे माथचन आहे. त्यांचे वय ६५ वर्षे आहे. आपल्या अंगणात हा शेतकरी ५० बादलांच्या मदतीने मोतींचे उत्पादन करत आहे. त्यांचे मोती आज देशविदेशात पण प्रसिद्ध आहे.

माथचन सौदी अरबच्या किंग फहद युनिवर्सिटी ऑफ पेट्रोलियम एंड मिनिरल्सच्या दुरसंचार विभागात प्राध्यापक होते. नोकरी करत असताना त्यांना अरोमाको ऑयल कंपनीकडून चीनला पाठवण्यात आले. त्यावेळी त्यांना मत्स्य अनुसंधान केंद्रात जाण्याची संधी मिळाली.

माथचन यांना आधीपासुनच मत्स्यपालन करण्याची आवड होती. तिथे त्यांना असे कळाले कि, तिथे मोती उत्पादनाचा डिप्लोमा आहे. त्यामुळे माथचन यांनी आपली नोकरी सोडली आणि डिप्लोमाला प्रवेश घेतला.

सहा महिन्यांचा हा डिप्लोमा त्यांनी १९९९ मध्ये पुर्ण केला. त्याच वर्षी त्यांनी मोतीची शेती सुरु केली. त्यांना हि शेती करण्यासाठी १.५ लाख रुपये खर्च आला. त्यात माथचन यांना ४.५ लाखांचे उत्पन्न मिळाले.

मोतीचे तीन प्रकारचे असतात, पहिले कृत्रिम मोती, दुसरे, संवर्धित मोती, तिसरे म्हणजे समुद्रात तयार होणारे. माथचन संवर्धित मोतींची शेती करतात. ते नदीमधून शिंपले आणतात, त्यांना उघडतात. त्यात जीवाणूंचे मिश्रीण मेष कंटेनरमध्ये टाकून १५-२५ सेल्सियस गरम पाण्यात ते बुडवतात.

हा मोती तयार होण्यासाठी दिड वर्षे लागतात. माथचन तयार झालेले मोती मोठ्याप्रमाणात ऑस्ट्रेमलिया, कुवैत, सऊदी अरेबिया, स्वित्झरलँड या देशात पाठवतात. या शेतीतुन माथचन यांना चांगलाच फायदा होत असुन ते लाखोंची कमाई करत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.