हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर आहेत हे विक्रम जे आजपर्यंत कोणालाही मोडता आलेले नाहीत

0

भारतीय संघाचा धडाकेबाज खेळाडू आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. १९८७ साली रोहितचा जन्म झाला होता. तो मुळचा नागपूरचा रहिवासी होता.

त्यानंतर रोहित मुंबईमध्ये करियर घडवण्यासाठी आला. रोहित जगभरात हिटमॅन म्हणून प्रसिद्ध आहे तो त्याच्या फलंदाजीमुळे. रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन वेळा द्विशतके लगावली आणि आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली.

२०१४ साली त्याने २६४ धावांचा डोंगर उभारला होता. रोहितच्या नावावरील हा विक्रम अद्याप कोणाला मोडता आला नाही. तुम्हाला कदाचित माहित नसेल की रोहितने आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीत त्याने आपल्या पहिल्याच दोन कसोटी सामन्यांमध्ये शतकी खेळी केली आहे.

पण पुढच्या १६ सामन्यांमध्ये रोहितला फक्त दोनच वेळा अर्धशतके करता आली. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात फलंदाजीमध्ये बदल केला आणि पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने शतक ठोकले होते.

त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रोहितच्या करिअरला वेगळे वळण लावले. रोहित शर्मा यापुर्वी संघात मधल्या काही क्रमांकावर खेळायला येत असे. त्यावेळी भारताला चांगल्या सलामीवीराची गरज होती.

हे धोनीला माहिती होते त्यामुळे धोनीने २०१३ साली रोहितला सलामीला यायला सांगितले. त्यानंतर रोहितने सलामीला आपण योग्य आहे हे दाखवून दिले. गगणचुंबी आणि लांब षटकार मारणारा खेळाडू अशी रोहितची ओळख निर्माण झाली होती.

तसेच वनडे क्रिकेटमध्ये तीनवेळा द्विशतक लगावणारा तो एकमेव खेळाडू आहे. अजूनपर्यंत कोणालाही ही कामगिरी करता आली नाही. रोहितने २००९ साली ऑस्ट्रेलियाविरूद्ध बंगळूरमध्ये वनडे सामन्यात पहिले द्विशतक लगावले होते. तेव्हा त्याने २०९ रन केले होते.

यानंतर रोहितने १४ नोव्हेंबर २०१४ साली कोलकाता येथे श्रीलंकेच्या विरूद्ध दुहेरी शतक लगावले होते. तेव्हा रोहितने २६४ धावा केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सगळ्यात जास्त वैयक्तिक धावा रोहितच्याच नावावर आहेत.

त्याने तिसरे दुहेरी शतक २०१७ साली मोहालीमध्ये श्रीलंकेच्या विरूद्ध लगावले होते. तेव्हा त्याने २०८ धावा केल्या होत्या. टी २० मध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाजसुद्धा रोहितच आहे. २०१७ साली त्याने ३५ चेंडूमध्ये शतक ठोकले होते.

तसेच भारताकडून टी २० मध्ये सर्वाधिक ४ शतके ठोकणारा रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये पदार्पनातच शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माचे नाव सर्वात आधी घेतले जाते.

रोहितने ६ नोव्हेंबर २०१३ रोजी कोलकाताच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरूद्ध शतक करून हा विक्रम केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माने ३ शतके ठोकली आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.