हर्षद मेहता ते तेलगी प्रकरण, आता पुन्हा एकदा मुंबई पोलिस आयुक्त, वाचा हेमंत नगराळे यांच्याबद्दल

0

 

सध्या राज्यात सचिन वाझे प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे, या प्रकरणामुळे मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आणि आता त्यांच्या ऐवजी हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलिस आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे.

हेमंत नगराळे यांची आयुक्तपदी निवड केल्यानंतर राज्यभरात त्यांचीच चर्चा सुरु आहे. हेमंत नगराळे आधीही काहीकाळ मुंबई पोलिस आयुक्त होते. तशी त्यांची कारकिर्द खुप मोठी आहे, अनेक हायप्रोफाईल केसमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे, चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीबद्दल…

डॅशिंग पोलिस अधिकारी म्हणून हेमंत नगराळे यांची राज्यात ओळख आहे. हेमंत नगराळे हे मुळचे चंद्रपुरचे. भद्रावतीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले होते. त्यानंतर त्यांनी पटवर्धन हायस्कुलमधून पुढचे शिक्षण घेतले. नगराळे हे स्वत: मेकॅनिकल इंजिनियर आहेत, तसेच त्यांनी फायनान्स मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

हेमंत नगराळे यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परिक्षा पास केली होती, त्यांची १९८७ साली आयपीएस म्हणून निवड करण्यात आली होती आणि त्यांची पहिलीच पोस्टींग चंद्रपुरात झाली होती.

राजूरा येथे त्यांची आयपीएस म्हणून त्यांची पोलिस दलातील कारकिर्द सुरु झाली. त्यानंतर १९९२ मध्ये सोलापुरात त्यांची डिसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी बाबरी प्रकरणावरुन सोलापूरात एक मोठी दंगल उसळली होती, पण नगराळे यांनी ती पुर्ण दंगल निडरपणे हाताळली होती.

पुढे १९९४ मध्ये रत्नागिरीत नगराळे यांची पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९९६ मध्ये झालेले एमपीएससी पेपर लीकचे प्रकरण सुद्धा नगराळे यांनीच हाताळले होते.

हेमंत नगराळे यांनी १९९६ ते २००२ अशी चारवर्षे सीबीआयमध्ये एसपी आणि त्यानंतर डीआयजी म्हणून सेवा बजावली. त्यावेळी त्यांनी १८०० कोटींचा माधोपुरा को-ओपरेटिव्ह घोटाळा, बिग बुल हर्शद मेहताने केलेला ४०० कोटींचा घोटाळा, १३० कोटींचा केतन पारेखचा घोटाळा अशा अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडला होता.

देशातला सर्वात मोठा घोटाळा समजल्या जाणाऱ्या ३२ हजार कोटींच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्याच्या तपासाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. २०१४ मध्ये काही काळासाठी हेमंत नगराळे यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी निवड करण्यात आली होती.

आता पुन्हा एकदा हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे मुंबई पोलिसांची प्रतिमा जपत सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आता उभे राहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.