टोमणे मारणाऱ्या लोकांनी घातली तोंडात बोटं; ३ फूट उंची असणारी या मुलीने एडव्होकेट बनून केला विक्रम

0

 

प्रत्येकाचे आयुष्य हे एका सरळ रेषेत नसते. आयुष्याच्या वाटेवर अनेक मोठ्या आव्हानांचा सामना तुम्हाला करावाच लागणार असतो.

अशात जर तुमची उंची छोटी असे तर तुम्हाला लोकांकडून चार टोमनेही मारले जातात. पण तुमची जिद्द आणि इच्छाशक्ती जर उंच भरारी घेण्यासाठी तयार असेल, तर ते लोकही तुमच्यासमोर हात टेकतात.

आजची हि गोष्ट पण अशाच एका मुलीची आहे, जिची उंची छोटी असली तरी तिने मोठे यश मिळवले आहे. या तरुणीचे नाव हरविंदर कौर असे आहे. हरविंदर देशातील सर्वात छोटी एडव्होकेट ठरली आहे. पण तिचा एडव्होकेट बनण्याचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता.

हरविंदर पंजाबच्या जालंधर शहरात राहते. तिची उंची ३ फुट ११ इंच इतकी आहे. त्यामुळे तिच्या उंचीवरुन तिला लोक नेहमीच टोमणे मारायचे, याचे तिला खुप वाईट वाटायचे. त्यामुळे अनेकदा ती स्वता:ला रुममध्ये बंद करुन घ्यायची.

चौथीपासून तिची उंची वाढण्यास बंद झाली होती. त्यामुळे तिने बाहेर जाणेच बंद केले होते. या सर्व गोष्टींमुळे तिच्या आई वडीलांना सुद्धा चिंता वाटायला लागली. तिची उंची वाढावी यासाठी घरच्यांनी उपचार केले पण त्याचा काही फायदा नाही झाला.

१२ वीच्या परिक्षा झाल्यानंतर तिने सुट्ट्यांमध्ये आत्मविश्वास वाढणारे व्हिडीओ बघण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिला पुन्हा एकदा आशेची किरण दिसू लागली. तिने सोशल मिडीयावर वेगवेगळे व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली.

सोशल मिडीयावर पण तिला टिकेचा सामना करावा लागला पण तिने लोकांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. तिने आपले ध्येय ठरवले आणि त्याच दिशेनी वाटचाल करण्यास सुरुवात केली. तिने घेतलेल्या मेहनतीमुळे शेवटी तिने आपले ध्येय गाठले आहे. आज हरविंदर देशातील सर्वात कमी उंचीची एडव्होकेट बनली आहे.

हरविंदरचे वडिल शमशेर सिंग ट्रॅफिक पोलिसमध्ये एएसआय आहे तर तिची आई एक गृहिणी आहे. आपल्या मुलीला एडव्होकेट झालेले पाहून तिच्या आई वडिलांचे आनंद अश्रू अनावर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.