कमी वयात आजारी पडला आणि त्याच आजारामुळे त्याला सुचली अशी कल्पना की आता झाला ‘तो’ करोडपती

0

 

 

अनेकदा व्यवसाय करताना त्याला यशस्वी करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहोत ज्याच्या एका भन्नाट आयडियामुळे तो कमी वेळात लाखो रुपये कमवायला लागला आहे.

या मुलाचे नाव हर्ष केडीया असे आहे. फक्त २३ वर्षे वय असलेल्या हर्षने खूप कमी वयात आपले नाव मोठे केले आहे. इतकेच नाही फॉर्ब्सने अंडर ३० ची यादी जाहीर केली आहे, त्या यादीत सुद्धा हर्षचे नाव आहे.

हर्ष त्याने तयार केलेल्या चॉकलेटमुळे प्रसिद्ध झाला आहे, त्याचे हे चॉकलेट डायबेटीज झालेले लोक सुद्धा खाऊ शकतात. २३ वर्षीय हर्ष मुंबईत राहतो. तो एक बिझनेस मॅन तर आहेच आहे सोबत तो एक लेखक आणि फेमस डायबेटिक शेफ आहे.

हर्षला खूप कमी वयात डायबेटीस झाला होता. त्यावरूनच त्याला हे डायबेटीसमध्ये खाता येईल असे चॉकलेट तयार करण्याची कल्पना आली होती.

त्याने डायबेटीज झालेल्या रुग्णांना चॉकलेट खाता येईल असे चॉकलेट बनवण्याचा निर्णय घेतला आणि पुढे त्याने डायबेटीजच्या चॉकलेटचा व्यवसायच सुरू केला. त्याच्या या चॉकलेटमुळे डायबेटीजच्या रुग्णांना चॉकलेट पण खायला मिळते आणि त्यांना चॉकलेटची ओरिजिनल टेस्ट सुद्धा मिळते.

त्याने वयाच्या ८ व्या वर्षांचीच किचनमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. तसेच टेस्टबाबत रिसर्च सुरू केली होती. त्याने वेगवेगळ्या प्रकरची डायबेटीज फ्रेंडली चॉकलेट तयार केली आहे. त्यात हॉट चॉकलेट, ब्राऊन चॉकलेट अशा प्रकारची चॉकलेट त्याने तयार केली आहे.

त्याच्या कंपनीचा टर्न ओव्हर ५२ ते ५५ लाख इतका आहे. डार्क चॉकलेट आणि शुगर फ्री चॉकलेट तयार केलेले पाहूनच त्याला या डायबेटीजच्या चॉकलेटची आयडिया सुचली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.