डिजे वाजवताना सुचली भन्नाट आयडीया, आता कमवतोय करोडो रुपये

0

 

जगात अशी कोणतीच गोष्ट नाहीये, जी अशक्य आहे. फक्त तुम्ही त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असे अनेक लोकांनी सिद्ध करुन दाखवले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका तरुणाची गोष्ट गोष्ट सांगणार आहोत जो एकेकाळी ५० रुपये घेऊन लग्नात डिजे वाजवायचा आता तोच तरुण आता करोडोंची उलाढाल करत आहे.

ही गोष्ट आहे हरियाणात राहणाऱ्या अरविंदची आहे. सुरुवातीला अरिविंदचे वडिल ठेकेदारीचे काम करायचे, तेव्हा सर्वकाही नीट होते. त्यांची परिस्थिती चांगली होती. पण एकेदिवशी त्याच्या वडिलांना या व्यवसायात खुप मोठे नुकसान झाले, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खुप बिघडली.

आर्थिक नुकसानामुळे त्यांना घर, जमीन सर्व विकून द्यावे लागले. त्यामुळे त्यांची इतकी परिस्थिती बिघडली कि वयाच्या १६ वर्षीच अरविंदने काम करण्यास सुरुवात केली. त्याला दिवसाला ५० रुपये मिळायचे.

कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधरत नव्हती, त्यामुळे त्याने वेगवेगळ्या नोकऱ्या सुद्धा केल्या, पण जास्त वेळ त्याला नोकरी करता आली नाही. एकेदिवशी त्याला डीजे चालवणारा मित्र भेटला. डीजे वाजवण्यात चांगले पैसे मिळायचे. त्याने डिजे कसा वाजवायचा ते शिकले आणि लवकरच तो त्याच्या परिसरात प्रसिद्ध झाला. त्याची आर्थिक परिस्थिती सुधरत होती.

त्या गावात किंवा जवळपासच्या गावात कुठलीही डिजेची ऑर्डर असली की त्यालाच बोलावले जायचे. हे काम करत असताना २०१३ त्याचे लक्ष ऍल्युमिनियम ट्रसच्या व्यवसायाकडे गेले. याची डिमांड डिजे पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात असायची.

त्याने लक्ष ऍल्युमिनियम ट्रसबद्दल जाणून घेतले. त्यावेळी तो अनेक व्यापाऱ्यांना भेटला आणि त्याने १० लाख रुपयांची गुंतवणूक करुन हा व्यवसाय सुरु केला. त्याची इव्हेंट मॅनेजमेंटच्या लोकांसोबत चांगली ओळख असल्याने त्याचा फायदा त्याला व्यवसायात झाला.

अरविंदने डेविल नावाची आपली कंपनी उघडलेली आहे. ही त्या क्षेत्रातली आता चांगलीच नावाजलेली कंपनी बनली आहे. त्याच्या या कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल १५ कोटी इतकी आहे. विषेष म्हणजे २०१९ मध्ये डेविल्स ट्रसला भारतील सर्वश्रेष्ठ ट्रसिंग कंपनीचा पुरस्कारही मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.