घरीच बसून सुरु केला ‘हा’ व्यवसाय, एका वर्षात केली ३० कोटींची कमाई

0

 

 

सध्या ई-कॉमर्स व्यवसायामुळे एखादी वस्तु खरेदी विक्री करणे खुप सोपे झाले आहे, त्यामुळे दिवसेंदिवस ई-कॉमर्स व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. असे असताना अनेक लोकांनी ई-कॉमर्स व्यवसायाला सुरुवात केली असून त्यातून लाखोंची कमाई करत आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा एका तरुणाची गोष्ट सांगणार आहोत, जो ई-कॉमर्स व्यवसायातून महिन्याला करोडोंची कमाई करत आहे. उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या या तरुणाचे नाव हरीश धर्मदसानी असे आहे.

हरिशचे कुटुंब राजस्थानमध्ये फुटवेअरचा व्यवसाय करायचे. पण हरिश जेव्हा १८ वर्षांचा होता, तेव्हा त्याचे वडिल वारले होते. त्याला फुटवेअरचाच व्यवसाय करायचा होता पण त्याला ते जमत नव्हते. त्यामुळे त्यांनी ऑफलाईन स्टोअर बंद करुन टाकले.

२००८ मध्ये कुटुंबाला सांभाळण्यासाठी त्याने एका स्टोअरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याला या कामाचे ६ हजार रुपये महिन्याला मिळायचे. पण त्याने खुप वर्षे काम केले, त्यामुळे त्याचा पगार ३० हजार रुपये झाला होता.

हरीशला नोकरीचा चांगला मोबदला मिळत होता, पण या नोकरीत त्याचे मन लागत नव्हते. ही नोकरी करत असताना त्याला अनेक ऑनलाईन काम करणारे लोक मिळाले. त्यातून त्याला ऑनलाईन व्यवसाय करण्याची कल्पना सुचली.

हरीश यांनी फुटवियर बनवणाऱ्या कंपन्यांशी मिळून ऑनलाईन व्यवसायाला सुरुवात केली. त्यांना घरातच एक छोटासा सेटअप तयार केला. ई-कॉमर्समध्ये त्यांना खुप ऑर्डर्स मिळत होते. त्याच्या खऱ्या व्यवसायाची सुरुवात तर तेव्हाच झाली जेव्हा त्याला फ्लिपकार्टसोबत काम करण्याची संधी मिळाली. २०१५ पासून त्याने फ्लिपकार्टसोबत काम कऱण्यास सुरुवात केली.

५ वर्षांमध्ये हरिश आता एक यशस्वी उद्योजक बनला आहे. सुरुवातीला त्याला ऑर्डर्स मिळण्यात अडचणी येत होत्या, पण त्याने धीर ठेवला आणि मेहनत घेत गेला. आता त्याला दिवसाला ५ हजारपेक्षा जास्त ऑर्डर्स मिळत आहे, तसेच तो या व्यवसायातून महिन्याला २ ते ३ करोड रुपयांची कमाई करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.