पतीच्या साहाय्याने डोंगर फोडून तयार केली विहिर, ओसाड शेतजमीन केली हिरवीगार

0

 

असे म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण आजची गोष्ट एका जोडप्याची आहे, ज्याने एकमेकांच्या मदतीने डोंगर फोडून पाणी काढले आहे.

मध्य प्रदेशच्या टीकमगडमध्ये राहणाऱ्या एका पत्नीने आपल्या पतीला प्रोत्साहित केले, तर त्या माणसाने मोठा दगड फोडून विहिर तयार केली आहे. आता त्या पाण्यापासून ते त्यांच्या शेतातल्या पिकांना पाणी देत आहे.

हा कारमाना टिकमगड जिल्ह्याच्या बडागावनगरमध्ये राहणाऱ्या हरिराम आहिरवार आणि त्यांची पत्नी पचिया आहिरवार यांनी केला आहे. पण हे सर्व शक्य होऊ शकले आहे, ते म्हणजे पचिया आहिरवार यांच्यामुळे.

हरिराम यांच्याकडे दोन एकर ओसाड जमीन होती, त्यावर पीक त्यांना उगवायचे होते, पण त्यांना त्यासाठी पाणी मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली पण तिथून त्यांना काही मदत मिळाली नाही.

तेव्हा हरिराम यांच्या पत्नीने हरिराम यांना विहिर खोदण्यसाठी प्रोत्साहन दिले. तेव्हा हरिराम यांनी विहिर खोदण्याचा निर्णय घेतला. गेल्या सात वर्षांनंतर त्यांना अखेर विहिर पुर्ण खोदण्यात यश मिळाली आहे. त्यांनी २० फुटाची विहिर खोदली आहे. आता विहिरीतून मिळालेल्या पाण्यातून त्यांची ओसाड पडलेली जमीन आता हिरवीगार झालेली आहे.

आधी ते दुसऱ्यांच्या हाताखाली मजूरी करायचे. त्यातून मिळालेल्या पैशातूनच ते कुटुंब सांभाळायचे. पण तेव्हाही खुप आर्थिक अडचणी यायच्या. पण आता शेतीत पाणी येत असल्यामुळे त्यांनी आंबा, पेरु, लिंबू, पपईसोबतच अनेक झाडे लावली आहे. आता त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे पचिया यांनी म्हटले आहे.

जेव्हा माझ्या पतीने हिंमतीने विहिर खोदण्यास सुरुवात केली तेव्हा आमच्या लक्षात आले की आम्ही आमच्या ओसाड जमिनीसाठी काहीतरी करु शकतो आणि त्यामुळेच आम्ही ७ वर्षांपासून ही विहिर खोदत होतो, आता त्या विहिरीतून मिळालेल्या पाण्यातून त्यांची जमीन आता हिरवीगार झाली आहे, असेही पचिया यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.