हार्दिक पंड्याचा नादच खुळा! वापरतो १ कोटी ६५ लाखांचे घड्याळ आणि ‘या’ महागड्या वस्तू

0

 

हार्दिक पंड्याची भारतीय क्रिकेट संघात अष्टपैलू म्हणून ओळख आहे. तसेच बऱ्यादा त्याने वेळोवेळी गोलंदाजीत आणि फलंदाजीत आपले चमत्कार दाखवले आहे. हार्दिक आपल्या लाईफस्टाईलमुळेही नेहमीच चर्चेत असतो.

हार्दिक महागड्या वस्तु ठेवण्याच्या आणि घालण्याचाही शौकीन मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया हार्दिककडे कोणकोणत्या महाग गोष्टी आहे..

१. हार्दिक पंड्याकडे Petek Philippe Nautilus Chronograph 5980/10R-010 नावाची गोल्डन आणि डायमंड वॉच आहे. या वॉचची किंमत १ कोटी ६५ लाख रुपये आहे.

२. हार्दिक पंड्याकडे एक महागडा शर्ट आहे. हार्दिकच्या या लुई व्ह्युटन पॅरिस प्रिंटेड शर्टची किंमत १ लाख ५ हजार रुपये इतकी आहे. हार्दिकने तो एका कॅज्युयल डिनरसाठी घेतला होता. हा शर्ट इतका महाग आहे कि एवढ्या पैशात एखादा सामान्य माणूस चारपाच वर्षे कपडे घेऊ शकतो.

३. हार्दिकने एकदा आपल्या कुटूंबासोबत डिनरला जाताना एक कुर्ता-पायजमा घेतला होता. Dolce and Gabana चा हा जॅकबर्ड कुर्ताची किंमत ९० हजार तर पायजम्याची किंमत ७० हजार रुपये एवढी आहे.

४. हार्दिकने घेतलेले वर्साचे Palazzo Slip On High Top White Sneakers ची किंमत २०० डॉलर इतकी आहे. ज्याची भारतीय रुपयांत १ लाख ४२ हजार रुपये किंमत आहे.

५. हार्दिक पंड्याची लिस्टमध्ये त्याचे जॅकेट सर्वात स्वस्त असल्याचे म्हटले जाते, त्याने घेतलेले वर्साचे हे जॅकेट ४२ हजार ५०० रुपयांचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.