याला म्हणतात जिद्द! दोन्ही पायांनी अपंग असताना केली लिंगाणा किल्ल्यावर चढाई

0

लिंगाणा किल्ल्याचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. या किल्लावर चढाई करताना भल्या भल्या लोकांना घाम फुटतो. या किल्लाचे लिंगाण्याचा डोंगर आभाळी गेला हे गाणेसुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र ईच्छाशक्ती असेल तर माणूस कोणतेही ध्येय गाठू शकतो त्याला कोणीही अडवू शकत नाही.

अशाच एका व्यक्तीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील दाढ गावातील चैतन्य कुलकर्णी नावाच्या एका अपंग युवकाने या खडतर डोंगरी किल्ल्यावर यशस्वी चढाई केली आहे.

विशेष म्हणजे चैतन्य दोन्ही पायांनी अपंग आहे. त्याला काठीचा आधार घेतल्याशिवाय चालताही येत नाही. दोन्ही पायांनी अपंग असताना त्याने लिंगाणा किल्ल्यावर यशस्वी चढाई केली आहे.

चैतन्य २०१४ साली ६० फुटाच्या नारळाच्या झाडावरून खाली पडला होता. या अपघातात त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. तेव्हापासून त्याला दोन काठ्यांचा आधार घेऊन चालावे लागत होते. अशा अवस्थेतही त्याने खडतर परिश्रम करून आणि केवळ जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई तीन वेळा सर केलं आहे.

तसेच त्याने हिमालयातील नेगी ड्युग शिखरावरही यशस्वी चढाई केली आहे. आणि आता त्याने लिंगाणा किल्ल्यावर यशस्वी चढाई केली आहे. चैतन्यच्या कंबरेखालचा भाग निकामी झाला असल्याने त्याला किल्ला चढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

त्याने हार मानली नाही आणि भारताचा तिरंगा लिंगाणा किल्लावर फडकवला. त्याच्या पायाची परिस्थिती पाहून अनेक जण त्याला साथ देण्यास नकार देत असत. परंतु बारामतीतील अनिल वाघ, अमोल बोरकर आणि संदीप कसबे यांच्या ग्रुपने त्याला साथ दिली.

त्याने हा किल्ला सर करण्यासाठी १२ फेब्रुवारीला सुरूवात केली होती. त्याने एक दिवस चढाई केल्यानंतर मध्ये एक विश्राम केला. त्यानंतर १३ तारखेला पुन्हा गडाची अवघड चढाई सुरू केली. उन्हामुळे त्याला पुढे जाण्यास खुप त्रास होत होता त्यामुळे त्याने पाच तासात लिंगाणा किल्लाची गुफा सर करण्यात य़श मिळवले.

यानंतर त्याने तिरंगा फडकवत आनंद व्यक्त केला. त्याने परतीचा प्रवासही यशस्वीरित्या पार पाडला. त्याच्या या कामगिरीमुळे अनेक अपंग व्यक्तीसांठी आज तो प्रेरणा ठरलेला आहे. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.