दोन्ही हात नसताना गाठली यशाची उंची; पायांनी परीक्षा देऊन झाला ऑफिसर

0

 

असे म्हणतात की माणसाचे भविष्य हातांच्या रेषेत लिहलेले आहे. तसेच कष्ट घेण्यासाठी मेहनत करण्यासाठी आपले हातच उपयोगी पडत असतात, मात्र भरत सिंग शेखावत यांची ही गोष्ट या सगळ्यांच्या अपवाद आहे.

एका अपघातात आपले दोन्ही हात गमावणारा भरत आज एका कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात आपल्या यशाचे शिखर गाठले आहे. विशेष म्हणजे भरतने पायाने परीक्षा देऊन तो परीक्षा पास झाला आहे.

भरत राजस्थानमध्ये सिकर येथे राहतो. सहा वर्षांचा असताना, तो एकदा शाळेत जात होता. तेव्हा तिथे एक विजेचा खांब होता आणि तिथे एक तुटलेली वायर होती. तो जात असताना त्या वायरला भरतचा हात लागला. त्यामुळे त्याला याचा जोरात करंट बसला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचे दोन्ही हात कापावे लागले. दोन वर्षे तो पलंगावरच होता.

भरतला त्याचे मित्र शाळेत जाताना दिसायचे त्यामुळे त्यानेही शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. त्याने पायाने लिहायला सुरुवात केली असता काही काळानंतर त्याला पायाने लिहता येऊ लागले. त्याचा आत्मविश्वास वाढत चालला होता. त्यामुळे आठवीत असताना त्याचा बोर्डात दुसरा क्रमांक आला होता.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर भरतने कृषी पर्यवेक्षक पदासाठी तयारी सुरू केली. भरतची जिद्द आणि त्याचा आत्मविश्वास पाहून राजस्थानमधील एग्री क्लासेसचे शिक्षक राम नारायण यांनी भरतला तीन वर्षे निशुल्क शिक्षण देऊन कृषी पर्यवेक्षक पदाची तयारीही करू घेतली.

भरतच्या मेहनत आणि आत्मविश्वास पहिल्याच प्रयत्नात तो ही परीक्षा उत्तीर्ण झाला. तसेच भरतने २०१६ स्टेट पॅरा ऑलम्पिक गेममध्ये १० किलोमीटरच्या मॅरेथॉन रेसमध्ये कांस्य पदक मिळवले आहे.

आजकाल सगळीकडे स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी कॉम्प्युटर शिकणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याने कॉम्प्युटर देखील शिकले आहे. भरत आपल्या पायाच्या बोटांनी कॉम्प्युटर चालवतो. इतकेच तर भरत मोबाईल देखील आपल्या पायाने वापरतो.

आपल्या हातांच्या रेषा पाहत बसत नशिबावर अवलंबून राहणाऱ्या लोकांपेक्षा हात नसताना आपले भविष्य लिहणाऱ्या भरतची ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देऊन जाते. आयुष्यात संकटे येत असतात, पण त्यावर मात करायला आपण शिकले पाहिजे, मला हात नसताना हे एवढं मिळवता आले आहे, तुम्हाला तर हात देखील, तुम्ही काहीही मिळवू शकतात, असे भरत म्हणतो.

Leave A Reply

Your email address will not be published.