वाढदिवसाच्या एक दिवस आधीच झाला होता भुजिया किंगचा मृत्यु, वाचा त्यांच्याबद्दल १० गोष्टी

0

आपल्या चवीने सगळ्यांचे मन जिंकणाऱ्या हल्दीरामला आज कोण नाही ओळखत. सण असो, नाश्ता असो किंवा जेवण असो सगळेजण नमकीन म्हणले की हल्दीरामचेच नमकीन प्रॉडक्टस विकत घेतात. हल्दीराम भुजियाला इतका मोठा ब्रॅन्ड बनवणाऱ्या महेश अग्रवाल यांचे ४ एप्रिल २०२० ला निधन झाले.

महेश अग्रवाल यांचे निधन वयाच्या ५७ व्या वर्षी झाले होते. आज आपण त्यांच्याबद्दल काही रोमांचक गोष्टी जाणून घेणार आहोत. महेश अग्रवाल हे गंगाविशन अग्रवाल यांचे नातू होते. गंगाविशन यांनी भुजियाचे एक छोटे दुकान राजस्थानच्या बिकानेर येथे खोलले होते.

त्यांच्यानंतर त्यांचा हा व्यवसाय त्यांचा मोठा मुलगा रामेश्वर लाल म्हणजे महेशचे वडील यांनी पुढे चालवला. अशारितीने महेश अग्रवाल यांनी आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे चालवला. त्यांनी त्याची सुरूवात कोलकाता येथून केली होती.

बिकानेर येथे भुजियाचे दुकान १९३७ मध्ये उभारण्यात आले होते. त्या दुकानात नमकीन व्यतिरीक्त मिठाईसुद्धा विकल्या जात होत्या. नमकीन विकण्याचे काम सगळ्यात आधी गंगाविशन यांचे वडील म्हणजे महेश अग्रवाल यांचे आजोबा यांनी केले होते.

त्यानंतर १९७० मध्ये कोलकातामध्ये नमकीनच्या मॅनुफॅक्चरींगची सुरूवात करण्यात आली. याचे सगळे श्रेय महेश यांचे वडील यांना जाते. सगळ्यांनीच या बिझनेसला पुढे नेण्यास मदत केली पण महेश अग्रवाल यांचे यामध्ये खुप मोठे योगदान होते.

त्यांनी कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांसोबत मिळून एक रोडमॅप तयार केला आणि व्यापार कसा वाढवता येईल याकडे लक्ष दिले. अग्रवाल कुटुंबियांनी हल्दीराम नावाने दिल्लीमध्ये एक कंपनी सुरू केली.

या कंपनीची सुरूवात १८८३ मध्ये झाली होती. महेश अग्रवाल यांच्यामुळे कंपनीला १९९० मध्ये वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर लोकांना हल्दीराम हा ब्रॅडची ओळख झाली. महेश अग्रवाल यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत.

त्यांच्या पत्नीचे नाव मीना अग्रवाल आहे. महेश अग्रवाल यांना लिव्हर संबंधित रोग झाला होता. सिंगापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. लॉकडाऊनमुळे महेश आणि त्यांचा पुर्ण परिवार सिंगापुरमध्ये अडकले होते. सिंगापूरमध्ये महेश अग्रवाल यांचा मृत्यु झाला.

तुमच्या माहितीसाठी हल्दीराम कंपनी नागपुरमध्ये १०० एकर परिसरात आहे. याच्याव्यतिरीक्त बीकानेर, कोलकाता आणि दिल्लीमध्ये त्यांचा खुप मोठा व्यापार आहे. कंपनीला खास ओळख त्यांच्या ट्रेडिशनल भुजियामुळे भेटली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.