दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केलेली १८ वर्षांची ग्रेटा आहे तरी कोण?

0

 

 

ग्रेटा थनबर्गला शेतकरी आंदोलनाबद्दल केलेले ट्विट चांगलेच महगात पडले आहे. दिल्ली पोलिसांनी ग्रेटावर द्वेष पसरवण्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

ग्रेटाने मागच्या दोन वर्षांपासून पर्यावरण रक्षणावर अभियान उभे केले आहे.ती फक्त १८ वर्षांची आहे. त्यामध्ये तिला चांगलेच यश मिळाले आहे. ग्रेटाच्या प्रयत्नांमुळे जगभरातील ८ टक्के लोकांनी विमान प्रवास टाळला आहे.

पर्यावरणाच्या बाबतीत अभियान सुरु केल्याने जगभरात तिला चांगलीच ओळख मिळाली आहे. आता गेल्या ७३ दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला तिने पाठिंबा दिल्याने ग्रेटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ग्रेटाचा जन्म स्टॉकव्होमध्ये ३ जानेवारी २००३ साली झाला होता. तिच्या आईचे नाव मालेना एमान असून आंतरराष्ट्रीय ओपेरा गायक आहे. तर तिचे वडीस स्वांचे हे अभिनेता आहे.

तिने वयाच्या ८ व्या वर्षी वायु प्रदुषण आणि जलप्रदूषणाबाबत माहिती मिळवली. तिने प्रदूषणाबाबत जाणून घेतल्यानंतर तिला खुप चिंता वाटू लागली. अशात तिला वयाच्या ११ व्या वर्षी एस्परजर सिंड्रोमसारख्या भयंकर आजाराने जडले. तिने मोठ्या हिंमतीने या आजाराला हरवले.

२०१८ मध्ये १५ वर्षांची असताना तिने शाळा सोडली आणि स्वीडनच्या संसदेबाहेर आंदोलनाला सुरुवात केली, तिने अनेक मोठमोठ्या नेत्यांना टार्गेट केले आणि त्यांना पर्यावरणाबाबत महत्वाचे निर्णय घेण्यास भाग पाडले.

तिने पर्यावरणात चांगला बदल व्हावा यासाठी सुरुवात आपल्या घरापासूनच केली होती. तिने आपल्या घरच्यांना मांसाहार करण्यास बंद करण्यास सांगितले. तसेच विमान प्रवास बंद करण्याचे सांगितले.

पर्यावरण कामासाठी ग्रेटाची चळवळ यशस्वी झाल्याने तिचा आत्मविश्वास आणखी वाढला, पर्यावरणाच्या समस्येवर आंदोलन करताना तिच्या हातातले स्कूल स्ट्राईक फॉर क्लायमेट असे लिहिलेल्या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.