पेट्रोलच्या भावांना कंटाळून सरकारी कर्मचाऱ्याने बनवली इलेक्ट्रिक बाईक, ७ रूपयांत चालते..

0

पेट्रोलचे भाव गगणाला टेकलेले असताना आणि कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना सामान्य नागरिकाचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोलचे भाव १०० रूपयांपर्यंत पोहोचलेले असताना बैतुल विद्युत विभागात कामाला असणाऱ्या लाईन हेल्परने देशी जुगाड केला आहे.

त्यांच्या या जुगाडामुळे १०० रूपयांत ४० किलोमीटर धावणारी बाईक आता ७ रुपयांत ३५ किलोमीटर धावत आहे. उषाकांत यांनी हा कारनामा केला आहे. त्यांनी आपल्या जुन्या पेट्रोल बाईकचे इलेक्ट्रिक बाईकमध्ये रूपांतर केले आहे.

शिवाय ही बाईक प्रदूषणमुक्त आहे आणि तिने खर्चही वाचतो आहे. उषाकांत हे विद्युत विभागात लाईनमॅन म्हणून काम पाहतात. उषाकांत म्हणाले की, माझ्याकडे १८ वर्षे जुनी बाईक होती जिला त्यांनी इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे.

बाईकमध्ये १८ वॅटच्या ४ बॅटरी आहेत आणि एक मोटर आहे. यावर ही बाईक चालते. या बाईकला चार्ज होण्यासाठी ६ तास लागतात. दुचाकी चार्ज करण्यासाठी १ युनिट वापर केला जातो. एकदा ही बाईक चार्ज झाली की ३५ किलोमीटर चालते.

उषाकांत पुढे म्हणाले की, आजच्या काळात प्रत्येक वस्तु महाग झाली आहे. जर तुम्हाला नवीन बाईक घ्यायची असेल तर ९० हजार ते १ लाखांपर्यंत खर्च येतो. हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या जुन्या बाईकला इलेक्ट्रिक बनवलं.

इलेक्ट्रिक बाईक बनवल्यामुळे त्यांची पैशांची खुप बचत होत आहे आणि प्रदुषणही होत नाहीये. उषाकांत त्यांचे मित्र दयाराम यांच्यासमवेत रोज ऑफिसला जातात आणि येतात. ते म्हणाले की जर त्याने आपली जुनी दुचाकी भंगारात विकली असती तर त्यांना खुपच कमी पैसे मिळाले असते.

बाईक खुपच जुनी होती आणि तिचे रेजिस्ट्रेशनही संपले होते. मग त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली आणि त्यांनी बाईकवर २८ हजार खर्च करून तिला इलेक्ट्रिक बनवले. त्यांनी सांगितले की आधी पेट्रोलच्या बाइकसाठी रोज ये जा करण्यासाठी ८० ते १०० रूपये खर्च होत होता पण आता तोच खर्च कमी झाला आहे आणि महिन्याला आता दोन ते अडीच हजार रूपये वाचत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.