लहानपणी खाल्ले लोकांचे टोमणे; आता वडापाव विकून करतोय महिन्याला करोडोंची कमाई

0

 

 

अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर सर्व म्हणजे वडापाव. पण आता वडापावचे क्रेज फक्त मुंबईतच नाही तर पूर्ण देशभरात आहे. तसेच जशी पाच मैलांवर भाषा बदलते तसंच काहीसे वडपावचे पण आहे.

अनेक जण वडापाव विकून लखपती होत असतात. पण तुम्ही कधी अशा एका माणसाला जो वडापाव विकून महिन्याला करोडो रुपये कमवत आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या वडापाववाल्याची गोष्ट…

या वडापाववाल्याचे नाव व्यंकटेश अय्यर असे आहे. व्यंकटेश अय्यर हे मुंबईच्या गोली वडापाव कंपनीचे मालक आहे. हा मुंबईतला खुप प्रसिद्ध वडापाव आहे. त्यांनी ही कंपनी २००४ मध्ये सुरु केली होती. सध्या या कंपनीच्या ३५० शाखा आहे. आता या व्यवसायाचा अभ्यास हार्वर्ड स्कूल, आयएमडी स्वित्झर्लंड आणि आयएसबी हैद्राबादकडून केला जात आहे.

अनेकदा आपले पालक आपल्याला म्हणत असतात, चांगल शिक्षण घेतले नाही तर वडापाव विकावा लागेल. असे टोमणे व्यंकटेश अय्यर यांनीही ऐकले. त्यांच्या घरच्यांना वाटत होते, आपला मुलागा डॉक्टर किंवा इंजिनियर बनेल पण त्यांनी वडापाव विकून एवढे यश मिळवले आहे. आज त्यांची कंपनी वर्षाला ५० कोटी रुपये कमवत आहे.

व्यंकटेश अय्यर हे तामिळ ब्राम्हण कुटूंबातले आहे. वडापाव विक्रीच्या व्यवसायात येण्याआधी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्यांनी जवळपास १५ वर्षे फायनान्स सेक्टरमध्ये काम करत होते.

पण त्यांची इच्छा रिटेल क्षेत्रात काहीतरी करण्याची मोठं करण्याची इच्छा होती. अनेकांना आपण रोजगार दिले पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांना २००४ मध्ये पहिले वडापावचे दुकान टाकले. त्याकाळातही वडापावचे प्रचंड वेड होते, त्यामुळो त्यांनी वडाराव विकण्याचा निर्णय घेतला होता.

वडापाव विकत असताना त्यांनी वडापाववर विविध प्रयोग करुन बघितले. त्यात त्यांनी शेजवान, पनीर वडापाव, मिक्स व्हेज,ल पनीर, आलू टिक्का सारख्या वेगवेगळ्या डिशेस लोकांसमोर सादर केल्या.

सध्या देशभरात गोली वडापावच्या ३५० शाखा आहेत. तसेच प्रत्येक ग्राहकला गोली वडापावच्या प्रत्येक शाखेकडून एकसारखीच चव मिळावी याकडे अय्यर यांनी विशेष लक्ष दिले आहे.

व्यंकटेश अय्यर हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांना आपले आदर्श मानतात. तसेच ते नेहमीच होतकरु आणि गरजू मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.