शेण काढण्यावरून पुतनीचा संसार मोडल्यामुळे संतापलेल्या चुलत्याने बनवले शेण काढण्याचे मशीन

0

उच्चशिक्षित पुतणीचा लग्नानंतर रोज शेण काढायला लावले जायचे. सततच्या या शेण काढण्यामुळे त्यांच्या घरात रोज भांडणे होत असत. सततच्या शेण काढण्यावरून होणाऱ्या भांडणामुळे पुतणीचा संसार मोडला.

ही वेळ दुसऱ्या कोणत्या मुलीवर येऊ नये म्हणून त्या पुतणीच्या चुलत्याने चक्क शेण काढण्याचे यंत्रच बनवले. पाच वर्षे मेहनत करून चुलत्याने हे यंत्र बनवले. पुर्ण धारूर पंचक्रोशीत हा चर्चेचा विषय ठरला आहे.

सगळीकडूनच या चुलत्याचे कौतुक केले जात आहे. चिंचपूर गावातील मोहन लांब हे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. सतत नवनवीन प्रयोग ते करत असतात. त्यांच्या पुतणीचा विवाह काही वर्षांपुर्वी एका शेतकरी कुटुंबात झाला होता.

त्यांची पुतणी बीए पदवीधर आहे. त्यांच्या पुतणीला नोकरी करण्याची इच्छा होती पण सासरच्या लोकांनी तिला नोकरी करण्यास नकार दिला. उलट तिला शेतीत काम करण्यास सांगितले. तिच्या सासरच्यांकडे अनेक जणावरे आहेत आणि त्यांचा दुधाचा व्यवसायही आहे.

दुधाचा व्यवसाय असल्याने शेण काढण्याची जबाबदारी नवविवाहितेवर आली होती. शेण काढण्याच्या कारणावरून मुद्दाम तिला त्रास देण्यात आला. यातून कुटुंबात खुप वाद होऊ लागले. त्यामुळे तिचा संसार मोडला.

या घटनेचा मोहन लांब यांना धक्काच बसला. तेव्हापासून त्यांनी शेण काढण्याचे यंत्र बनविण्यासाठी विविध प्रयोग सुरू केले. त्यांनी पाच वर्षे मेहनत घेतली आणि शेण काढण्याचे यंत्र बनवले. हे यंत्र खुप चांगल्या रितीने काम करते आणि त्याला जास्त मनुष्यबळही लागत नाही.

हे यंत्र एकाचवेळी १० लोकांचे काम सोपे करू शकते. त्यांनी आधी त्याचे एक प्रारूप मॉडेल तयार केले. त्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांनी पुण्यातून मागवल्या होत्या. यात जीआय, स्टील, मोटार बॅटरी, चॅर्जर, बॉडीसाठी लागणारे स्टील, चाके अशा सगळ्या वस्तू त्यांनी पुण्याहून मागवल्या होत्या.

सर्व वस्तूंच्या माध्यमातून त्यांनी हे यंत्र बनवले आहे. याआधी त्यांनी अनेक शेतीसाठी लागणारी यंत्रे बनवली आहेत. त्यातील एका यंत्राला त्यांना पेटंटदेखील मिळाले आहे. सध्या त्यांच्याकडे अनेक शेतकरी वेगवेगळी अवजारे बनवून घेण्यासाठी येत असतात.

हे ही वाचा..
वेटरचं काम सोडून केली भरिताच्या वांग्याची शेती, आता कमावतोय लाखो रूपये
मॅडम म्हणाल्या आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी, तेथून त्याने ठरवलं आपण कलेक्टर व्हायचं
फक्त एमएच ०९! पठ्ठ्याने न्यु जर्सीत विकत घेतली कोल्हापुरची नंबर प्लेट

Leave A Reply

Your email address will not be published.