‘असे’ करा शेळीपालन आणि कमवा लाखो रुपये; वाचा कोल्हापूरच्या शेतकऱ्याची कहाणी

0

 

 

असे म्हणतात शेती करायची असेल तर डोकं लावल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. आता तर अनेक उच्चशिक्षित तरुण शेतीत उतरु पाहत आहे.

आजची हि गोष्ट अशा एका तरुणाची आहे, ज्याने बी. टेकचे शिक्षण घेऊन नोकरी न करता शेती करुन स्वता:ला यशस्वी बनवले आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याची गोष्ट…

बी. टेक करुन गोट फार्मिंग करणाऱ्या या तरुणाचे नाव पंकज कृष्णात पाटील असे आहे. पंकज कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्या घरची अडीच एकर शेती आहे.

त्याने त्याच्या गोट फार्मिंगमध्ये एक वेगळाच प्रयोग केला आहे. खाटकाला बोकड विकण्यापेक्षा त्याने ग्राहकांनाच मटन विकण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यातूल तो महिन्याला चांगलीच कमाई करत आहे.

पंकजकडे वडिलोपार्जित अडीच एकर शेती आहे. त्यामध्ये दोन एकर शेतीत ऊसाची लागवड केली आहे. तर उरलेल्या शेतीत त्याने शेळींना खाण्यासाठी पीकांची लागवड केली आहे.

पंकजचे बी.टेक झाले असले तरी त्याने नोकरी करुन गुलामी करत बसण्यापेक्षा गोट फार्मिंग करण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये त्याने हि फार्मिंग करण्यासाठी पाच गुंठे जागा निवडली आणि ६० बाय ९० फुट आकाराचे शेड उभारले. तसेच शेळ्यांना वावरता यावे यासाठी मोकळी जागाही ठेवली.

गोट फार्मिंगची सुरुवात त्यांनी २५ शेळ्यांपासून केली होती, तर सध्या त्याच्याकडे सर्व मिळून ६० शेळ्या आणि बोकड आहे. तसेच त्याच्याकडे २० गावठी नर मेंढ्याही आहे. ते बिटल, सिरोही आणि सोजत जातीच्या शेळ्या पाळतात.

अशी घ्या शेळ्यांची काळजी-
१. शेळ्यांना खाद्य देताना वैविध्य ठेवा.
२. त्यांना सकस आणि पो,क आहार द्या.
३. गाभण शेळ्या किंवा ज्या शेळ्यांना पिल्ले झाली त्यांना जास्त खाद्य द्या.
४. पावसळ्यात हिरवा चारा तर उन्हाळ्यात मका, शाळु किंवा बाजरीचा मुरघास तयार करा.
५. शेळ्यांच्या खाद्यात सोयाबीनचाही वापर करा.

गोट फार्मिंग करताना पंकजने वेगवेगळे प्रयोग करुन पाहिले. त्यात त्यांनी शेळीचे दूध विकण्याचास निर्णय घेतला. तसेच गांडूळ खत तयार करण्याचाही त्यांनी निर्णय घेतला. त्यासोबतच बोकड खाटकाला न विकता त्याने थेट मटन विक्रीचा निर्णय घेतला.

२०१९ मध्ये त्याचा सर्व खर्च वजा करता तीन लाख त्याला नफा झाला होता, तर वर्षाला दहा ट्रॉली लेंडीखत तयार होत असल्याने त्याचे ४० हजार रुपये मिळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.