जाणून घ्या रणजितसिंह डिसले यांनाच का मिळाला ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार…

0

 

सोलापूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना जागतिक स्तरावर मानाचा पुरस्कार असलेला ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि क्युआर कोड पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून राज्यातच नाही तर देशात शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी रणजितसिंह यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात परतेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत रणजितसिंह डिसले प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. त्यांचे शिक्षण सुलेखा विद्यालयात झाले होते. २००९ पासून ते प्राथमिक शिक्षण म्हणून काम करत आहे.

सध्या भारत खूप कठीण काळातून जात आहे. या काळात सगळ्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना हा हक्क मिळवून देण्यात शिक्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात, असे डिसले यांनी म्हटले आहे.

डिसले यांनी मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले आहे. त्यामुळेच शाळेतून या मुलींची गळती थांबली आहे. तसेच डिसले यांनी शिक्षणात इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला आहे. पुस्तकांमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने कसे शिक्षवता येईल, यासाठी पण त्यांनी प्रयत्न केले आहे.

तसेच रणजितसिंह डिसले तब्बल ८३ देशातल्या मुलांसाठी ऑनलाईन क्लासेस घेतात. तसेच देशांतील विद्यार्थ्यांसाठी ते ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ नावाचा कार्यक्रमदेखील राबवत आहे. त्यांच्या या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

युनेस्को आणि लंडनच्या वार्कि फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी जगभरातून १२ हजार शिक्षकांचे नामांकन करण्यात आले होते. त्यापैकी १० शिक्षकांना अंतिम यादीत स्थान देण्यात आले होते, त्या १० शिक्षकांमध्ये डिसले यांचे नाव देखील आहे.

या पुरस्काराची रक्कम १ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ७ करोड रुपये इतकी आहे. मात्र डिसले यांनी यातली निम्मी रक्कम १० शिक्षकांमध्ये वाटण्याचे ठरवले आहे. दिसले यांच्या या निर्णयामुळे या शिक्षकांना प्रत्येकी ४० लाख रुपये मिळणार आहे.

माझ्या मते या १० शिक्षकांमध्ये सारखीच गुणवत्ता आहे. दुसरे म्हणजे १० शिक्षक जेव्हा वेगवेगळ्या देशातील मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरतील तेव्हा मोठा बदल घडून येईल, असे रणजितसिंह डिसले यांनी हा निर्णय घेण्यामागचे कारण सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.