काय सांगता! ट्रॅफिक सिग्नलवर काम करून ‘हा’ तरुण महिन्याला कमवतोय २ लाख

0

आजकाल प्रत्येक जण नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसून येत आहे. पण अनेकदा व्यवसायात गरजेची असणारी मेहनत न घेतल्याने अनेकांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न अर्धवटच राहते.

आज मात्र तुम्हाला अशा तरुणाची गोष्ट सांगणार आहोत, जो कोणतेही मोठ्या प्रमाणात भांडवल न लावता व्यवसाय करून महिन्याला २ लाख रुपये कमावत आहे. ही गोष्ट आहे मुंबईच्या गौरव लोंढे या तरुणाची.

२००९ मध्ये मुंबई महानगरमध्ये गौरव पिझ्झा डिलिव्हरीचे काम करायचा. रोज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत त्याची सुट्टी होत असायची. रस्त्यात वाहनांची खूप गर्दी असल्याने त्याला घरी जाण्यास ३ तास लागायचे.

जेव्हा तो ट्रॅफिकमध्ये अडकायचा तेव्हा त्याच्या डोक्यात, काहीतरी खायला मिळालं असतं तर बरं झालं असतं, असा विचार नेहमीच यायचा. एकदा तो ट्रॅफिकमध्ये अडकलेला असताना त्याच्या डोक्यात एक विचार आला. जशी आपल्याला ट्रॅफिकमध्ये भूक लागते, तशीच लोकांनाही लागत असेल, असे गौरवला वाटले.

गौरवने ट्रॅफिकमध्ये असलेल्या लोकांना वडापाव विकण्याचा विचार केला. त्याची आई घरी चांगला वडापाव बनवायची, तसेच त्याला फूड डिलिव्हरीचा चांगला अनुभव होता. त्यामुळे त्याने स्वतःचाच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्याने २० रुपयांचे वडापावचे एक पॅकेट बनवण्यास सुरुवात केली. त्या पॅकेटमध्ये त्याने तोंड आणि हात पुसण्यासाठी टिशू पेपर आणि पाणी पिण्यासाठी एक बॉटल या सर्व गोष्टी होत्या. पॅकेट फक्त २० रुपयांचे असल्याने ते सर्वांना परवडणारे होते.

गौरवचा हा व्यवसाय त्याला चांगल्याच फायद्याचा ठरला. त्याला या व्यवसायातून महिन्याला २ लाख रुपये मिळत आहे. एकेकाळी फूड डिलिव्हरी करणारा मुलगा आज महिन्याला लाखो रुपये कमवत आहे, त्यामुळे गौरव अनेकांसाठी आता प्रेरणादायी ठरताना दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.