वाह रे पठ्ठ्या! उच्च शिक्षण घेऊन ‘हा’ तरुण करतोय कुंभार काम; कारण ऐकून कौतुक वाटेल

0

 

आजकाल उच्चशिक्षण घेऊन अनेक तरुण नोकरीच्या मागे फिरताना दिसून येतात. अशात खूप कमी लोक असे असतात जे आपल्या गावातील वडिलोपार्जित व्यवसायात हातभार लावतात.

आजची ही गोष्ट एका अशा तरुणाची आहे, ज्या तरुणाने उच्चशिक्षण घेऊन, आपल्या गावाकडच्या वडिलोपार्जित व्यवसायालाच बळकटी दिली आहे. या तरुणाचे नाव गणेश कुंभार आहे.

गणेश पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या शहा गावात राहतो. गणेशने उच्चशिक्षण घेतले असून त्याने नोकरीच्या मागे धावण्याऐवजी त्याच्या पारंपरिक व्यवसायलाच आधुनिकतेची जोड दिली आहे.

गणेश कुंभार व्यवसायात करतो. आता काळानुसार हा व्यवसाय पण बदलताना दिसत आहे. कुंभार व्यवसायात आधुनिक यंत्रणा आल्याने या व्यवसायाला बळकटी मिळू लागली आहे. हातांनी फिरवले जाणारे चाक आता विजेवर फिरू लागल्याने चाक फिरवण्याचे श्रम आता वाचत आहे.

गणेशने एम. ए. मराठी पर्यंतच शिक्षण केले आहे. मात्र सध्याच्या काळात जी नोकऱ्यांची परिस्थिती आहे, ती पाहता त्याने वडिलोपार्जित व्यवसायच करण्याचा निर्णय घेतला आहे.

चाक आता विजेच्या साहाय्याने फिरू लागल्याने त्यावर पणत्या, सुगडी, मडकी, गाडगी, माठ, अशा वेगवेगळ्या आकर्षित आणि सुबक वस्तू बनवल्या जात आहे. चाकाला विद्युत मोटार जोडल्याने विजेचे बटन दाबताच चाक फिरायला सुरुवात होते.

नववर्षात पहिल्याच महिन्यात येणारी मकरसंक्रांत आता जवळ आली आहे. मकरसंक्रांतला सुवसणींना इतर साहित्याबरोबरच महत्वाच्या असणाऱ्या सुगड्या बनवण्याचे काम कुंभारांकडे असते. सध्या खण बनवण्यासाठीही शहा गावातील कुंभारांची धावपळ बघायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.