‘अफशाची गरुडझेप’ मुस्लिम खाटीक समाजातून बनली पहिली महिला पायलट

0

आता महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात आता महिलांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. आता त्याच महिलांच्या यादीत एक नवीन नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे अफशा कुरेशी या तरुणीचे.

अफशा कुरेशी ही देशातील मुस्लिम खाटीक समाजातील पहिली महिला पायलट बनली आहे. मुंबईच्या भाईंदर पश्चिम भागात अफशा आपल्या कुटुंबासोबत राहते.

मुंबईतून शिक्षण घेऊन अमेरिकेत अफशा पायलटच्या प्रशिक्षणासाठी गेली होती. त्यानंतर लायसन्सचा अभ्यासक्रम तिने पूर्ण केला असून ती नुकतीच भारतात परत आली आहे. तसेच आता ती पायलटच्या पदावर रुजू झाली आहे.

अफशाच्या या कामगिरीमुळे अफशा देशातील मुस्लिम खाटीक समाजातील पहिली महिला पायलट बनली आहे. विशेष म्हणजे परदेशात नोकरी मिळत असतानाही तिने मातृभूमीला प्राधान्य देत भारतात नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरात तिचे कौतुक केले जात आहे.

मुस्लिम समाजात अजूनही काही महिलांना रीतिरिवाजनुसार वागणूक दिली जाते. अनेक तरुणींचे कमी वयात लग्न लावून दिले जातात, अशात आपल्या स्वप्नांना पूर्ण करून अफशाने अनेक महिलांना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.

अफशाने तिच्या या कामगिरीचे श्रेय कुटुंबाला आणि तिच्या शिक्षकांना दिले आहे. तसेच आपल्या वडिलांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांच्या प्रेमामुळे मला हे यश गाठणे शक्य झाल्याचे अफशान म्हटले आहे.

अतिशय कठीण परिश्रमातुन मिळालेल्या या यशात आई, वडील, आजी, भाऊ, बहीण आणि नातेवाईकांचा मोठा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मला माझे स्वप्न पूर्ण करता आले आहे, असेही अफशाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.