या माणसामुळे सोपे झाले घरबसल्या हॉटेल रूम बुक करणे, वाचा ओयो रूम्सच्या मालकाची कहाणी

0

शिक्षण सोडून ओयो रूम्सचा पाया रचणाऱ्या संस्थापक रितेश अग्रवाल यांची यशोगाथाही खूप रंजक आहे. कोणतीही मोठी पदवी न घेता त्यांनी हे स्थान मिळवले आहे. रितेश अग्रवाल यांनी महाविद्यालयीन अभ्यास सोडून जवळपास ७ वर्षांपूर्वी वयाच्या २४ व्या वर्षी ओयो रूम्सची स्थापना केली होती.

काही वर्षांपूर्वी रितेश ओडिशाच्या एका छोट्या गावात सिमकार्ड विकत होते. पण आज त्यांनी कोट्यवधींचा व्यवसाय केला आहे. त्यांना एका टीव्ही रिमोटद्वारे ओयो रूम्सची स्थापना करण्याची कल्पना आली होती.

रितेश अग्रवाल हे ओडिशामधील बिसम कटक या नक्षलग्रस्त भाग असलेल्या छोट्या गावातले रहिवासी आहेत. रितेश यांना ओयो रूम्स उघडण्याची कल्पना टीव्ही रिमोट कंट्रोलमधून आली. त्यांचा असा विश्वास होता की टीव्ही हा आपण लांब राहूनही कंट्रोल करू शकतो.

हेच काही हॉटेल्ससाठी करता येईल जेणेकरून ग्राहकांना घरी बसून हॉटेल मिळेल. ओयो रूम्सची स्थापना या आयडीयामुळे झाली. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या अनुभवांबद्दल सांगितले की जेव्हा त्यांनी गुरगावमध्ये पहिले हॉटेल सुरू केले तेव्हा ते हाऊसकिपींग, सेल्स, मुख्य कार्यकारी अधिकारी हे सर्व काम एकटेच पाहायचे.

ते ओयो रूम्सचा ड्रेस घालून कस्टमरकडे जायचे आणि त्यांना रूम दाखवायचे. त्यांना यासाठी बर्‍याच वेळा टीप मिळाली आणि त्यांना बऱ्याच वेळा रूममधून हाकलून लावण्यात आले पण तरीही ते ग्राहकांशी नीटच वागायचे.

त्यांनी कधीही त्यांच्याशी वाद घातला नाही. असं करून त्यांनी आपला बिझनेस वाढवला. हळू हळू त्यांना अनेक हॉटेल्स जोडले गेले. त्यांचा पुर्ण बिझनेस ऑनलाईन सुरू झाला. त्यावेळी हॉटेल रूम बुक करण्यासाठी वापरण्यात येणारे जास्त ऍप्स नव्हते त्यामुळे त्यांची ही आयडिया यशस्वी झाली.

आज ते हजारो करोडचे मालक आहेत. ऍपद्वारे हॉटेल रूम बुक करून देणाऱ्या ओयो या भारतीय कंपनीमध्ये चीनची कैब एग्रिगेटर कंपनी Didi Chuxing या कंपनीने ७०० करोड रूपयांची भागिदारी केली आहे.

या गुंतवणूकीमुळे ओयो या कंपनीचे मुल्य वाढून ५०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ३५ हजार कोटी रुपये झाले आहे. दीदी चक्सिंगद्वारे नियंत्रित स्टार व्हर्च्यु इन्व्हेस्टमेंटद्वारे ही गुंतवणूक करण्यात आली होती.

या करारामुळे ओयोचे १०० दशलक्ष डॉलर्सचा फायनानसिंग राऊंट पुर्ण करण्याचे लक्ष पुर्ण झाले आहे. या राऊंडनंतर सॉफ्टबँक व्हिजन फंडने कंपनीत ८०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी सिंगापूरस्थित परिवहन कंपनी ग्रॅबने ओयोमध्ये १०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली.

आज रितेश अग्रवाल हजारो कोटींचे मालक आहेत. कोणाला विश्वासही बसणार नाही की त्यांना ओयो रूम्सची आयडिया एका टीव्ही रिमोटमधून आली असेल. जर बघण्याची नजर असेल तर कशातही आशेचा किरण दिसतो ही गोष्ट खरी आहे. तुम्हाला त्यांची ही यशोगाथा कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.