नादच खुळा! पाचवेळा दहावी नापास झालेल्या पठ्ठ्याने घरी बसून तयार केली ३५ रिमोटवर चालणारी विमानं

0

लॉकडाऊन काळात अनेक लोकांनी गरजू लोकांची मदत केली आहे. अशात गुजरातच्या बडोदामध्ये राहणार एक २० वर्षीय तरुण लॉकडाऊन काळात लोकांची मदत करण्यासाठी पुढाकार घेताना दिसून आला आहे.

गुजरातमध्ये राहणाऱ्या या तरुणाचे नाव प्रिंस पांचाळ असे आहे.  प्रिंसने लॉकडाऊनमध्ये गरजू लोकांना अन्न, गोळ्या-औषधे आणि गरजूच्या वस्तु पुरवण्यासाठी छोटी विमाने आणि ड्रोन तयार केले आहे.

या विमानांच्या आणि ड्रोनच्या खाली एक बॉक्स लावला जातो. त्यानंतर त्यामध्ये गरजेची वस्तु ठेवून म्हणजेच औषधे, अन्नधान्याचे पॅकेट्स ठेवले जातात आणि ते रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने उडवून हव्या त्या ठिकाणी पोहचवले जातात. विशेष म्हणजे प्रिंस पाचवेळा दहावी नापास असातानाही त्याने इतकी मोठी कामगिरी करुन दाखवली आहे.

त्याने तयार केलेले ड्रोन ५०० ग्रॅम ते ७५० ग्रॅम वजन उचलू शकते. दहावी नापास झाल्यानंतर त्याला काहीतरी वेगळे करायचे होते. त्याने स्वता:चे छोटे विमान तयार करायचे ठरवले, जे रिमोटवर कंट्रोल करता येईल. त्याने आतापर्यंत ३५ स्वदेशी मॉडेल तयार केले आहे.

लॉकडाऊनमध्ये सर्व देश बंद होता, तेव्हा प्रिंसने बनवलेल्या विमानांचा चांगलाच उपयोग झाला आहे. त्याने आपल्या ड्रोनमध्ये जीपीएस सिस्टिम आणि टेलीमेंटरी सुद्धा लावलेले आहे. याच्या उपयोगाने ड्रोन योग्य ठिकाणी पोहचवता येते.

प्रिंसने ही विमाने बॅनर आणि होर्डिंगपासून बनवलेले आहे. त्याच्या कारनाम्यामुळे त्याला शेजारचे लोकं ‘तारे जमीन पर’मधला मुलगा सुद्धा म्हणतात. सध्या मला आपले दहावीचे शिक्षण पुर्ण करायचे आहे, असे प्रिंसने म्हटले आहे.

प्रिंसचे प्रिंस पांचाळ मेकर नावाने युट्यूब चॅनेलसुद्धा आहे. त्याने या चॅनेलवर स्वदेशी विमान बनवण्याची व्हिडीओ शेअर केलेली आहे. प्रिंसने हे दाखवून दिले आहे, की टॅलेंटसाठी कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.