प्रेरणादायक! पाच मैत्रिणींनी मिळून असे काही केले की आज महिन्याला कमवत आहेत लाखो रूपये

0

आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. अनेक स्त्रिया मोठ्या पदावर कार्यरत आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून त्या सध्या प्रत्येक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्त्रीबद्दल सांगणार आहोत.

दिल्लीतील दिव्या राजपूत यांनी शिक्षण क्षेत्रात २० वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे. तिने मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्समध्येही काम केले आहे. सध्या दिव्या तिच्या चार मैत्रिणींसोबत एक ईको फ्रेंडली स्टार्टअप चालवत आहे.

या ठिकाणी त्या आवश्यक असलेल्या सगळ्या वस्तुंची विक्री करतात. त्यांनी तीन महिन्यांपुर्वी यासाठीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. त्यांना दरमहिन्याला २०० च्या आसपास ऑर्डर येतात आणि त्यांना त्यातून एक लाख रूपयांपर्यंतचा नफा होतो.

दिव्याला कनेक्ट होऊन २०० पेक्षा जास्त महिला सध्या पैसै कमवत आहेत. सध्या तिचे वय ४३ वर्षे आहे. दिव्याने सांगितले की, माझी मैत्रीण काकुल रिझवी ही एका मार्केटिंग प्रोफेशनल होती. तिचा कर्करोगाने मृत्यु झाला.

डॉक्टरांनी आम्हाला सेंद्रिय उत्पादने वापरण्याचा सल्ला दिला. त्यावेळी आम्हाला सुचलं की देशात अजूनही अशा प्लॅटफॉर्म्सची संख्या खुप कमी आहे जिथे सामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत सेंद्रिय उत्पादने विकत घेता येतील.

मग आम्ही ठरवले की आपण स्वताचे प्लॅटफॉर्म तयार करू शकतो जेथे दररोजच्या स्वरूपात प्रत्येक गोष्ट सेंद्रिय स्वरूपात मिळेल. त्यानंतर मी नोकरी सोडली आणि काकुल इको नावाने माझा स्टार्टअप सुरू केला.

तिच्या मैत्रिणीचा मृत्यु झाल्यानंतर दिव्या एकट्या पडल्या होत्या पण त्यांनी हा व्यवसाय पुढे चालुच ठेवला. यामध्ये पुढे गेल्यानंतर दिव्या यांच्यासोबत पूजा अरोरा, सुरभी सिन्हा, आस्था व क्रिस्टाना ग्रोवर जोडल्या गेल्या.

सध्या त्यांच्याकडे १०० प्रकारची उत्पादने तयार होतात. यामध्ये स्टेशनरी, ऍग्री वेस्ट मग, जूट, कॅनव्हास बॅग, हर्बल इम्युनिटी बूस्टर, हळद, हैंडमेड क्राफ्ट, वेलनेस प्रोडक्ट बनवले जातात. दिव्या म्हणाल्या की येत्या काही दिवसांत आम्ही आणखी काही नवीन उत्पादने बाजारात आणणार आहोत.

आम्हाला छोट्या कारागिरांना मोठ्या बाजारात स्थान मिळवून द्यायचे आहे. लोक त्या वस्तु खरेदी करत आहेत. पण तरीही त्यांना बाजारात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांना योग्य किंमत मिळत नाही. बरेच लोक या वस्तु विकतच नाहीत.

माझे पुर्ण लक्ष त्या कारागिरांना मोठ्या बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचे आहे, असे दिव्या म्हणाल्या आहेत. आज अनेक महिला त्यांच्या बरोबरीने पैसे कमवत आहेत. अनेक छोट्या कारागिरांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या वस्तुही चांगल्या असल्यामुळे लोक आवडीने त्यांच्याकडून वस्तु खरेदी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.