त्या कलाकारावर आलीये आता रिक्षा चालवण्याची वेळ, एकेकाळी माधुरी दीक्षितसोबत केले होते काम

0

डान्स दिवाने हा सध्या चर्चेत असलेला शो आहे. या डान्स शो चे अनेक चाहते आहेत. या शोमध्ये अभिनेत्री माधुरी परीक्षक म्हणून भूमिका साकारत आहे. पण सध्या सोशल मीडियावर एका व्हीडिओने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेता सलमान खान, अनिल कपूर आणि अभिनेत्री जॅकलिन या शोमध्ये पाहुणे म्हणून पोहोचले आहेत. याच शोमध्ये फिरोज खान याने आपल्या डान्सने अनेकांची मने जिंकली.

फिरोज यांनी एक एक दोन तीन या गाण्यावर अनिल कपूर यांच्यासोबत डान्स केला. त्यांनी माधुरी दीक्षितसोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. फिरोज खान यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे.

त्यांचं वय ५२ वर्षे असले तरी ते खूप सुंदर डान्स करतात. त्यांना डान्सचे खूप वेड आहे आणि हेच वेड त्यांना शोमध्ये घेऊन आले. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे डान्सवर खूप प्रेम आहे. त्यांचे सेमी क्लासिकल आणि बॉलीवूड स्टाईल डान्सवर खूप प्रेम आहे.

अनिल कपूर यांच्यासोबत त्यांनी एक दोन तीन या गाण्यावर डान्स केला होता. त्यांनी आतापर्यंत ७० ते ८० चित्रपटात काम केले आहे. त्यांचे स्वप्न आहे की त्यांना एक डान्सचा क्लास सुरू करायचा आहे.

मात्र त्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे. डान्स दिवानेच्या सेटवर त्यांनी आपल्या डान्सने अनेकांचे मन जिंकले होते. डान्सवर त्यांनी चांगलाच ठेका धरला होता आणि ते हे ही म्हणाले होते की, माझे डान्सवर खूप प्रेम आहे.

फिरोज खान यांचे परीक्षकांनी खूप कौतुक केले होते. माधुरी दीक्षित म्हणाल्या की, मला फिरोज खान यांच्या रिक्षामध्ये बसायचं आहे. अनिल कपूर म्हणाले की, फिरोज यांच्या डान्समध्ये अधिक सुधारणा झाली आहे.

परिस्थिती कशीही असली तरी माणूस आपल्या कलेने श्रीमंत असतो. परिस्थिती सांभाळत त्यांनी आपल्या कलेला जोपासले. हे खूप कौतुकास्पद आहे. त्यांच्या या जिद्दीमुळे परिक्षकही आश्चर्यचकित झाले. पूर्ण देशातून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.