‘या’ काका पुतण्याची पुर्ण तालुक्यात चर्चा, स्ट्रॉबेरीची शेती करून मिळवला तिप्पट नफा

0

अनेक शेतकरी शेतीमध्ये नुकसान झाले किंवा कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करतात. पण काही शेतकरी असेही असतात जे पुन्हा उमेदीने उभे राहतात आणि एक प्रगतीशील शेतकरी म्हणून पुढे येतात.

बरेच शेतकरी आधुनिक शेती करून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. आज आम्ही अशाच एका काका पुतण्याबद्दल सांगणार आहोत ज्यांनी इतिहास घडवला आहे. सज्जन पवार आणि त्यांचा पुतण्या प्रशांत पवार यांनी पनवेल तालुक्यात वावंजे गावात स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्णय घेतला.

पाहता पाहता त्यांचा प्रयोग खुप यशस्वी झाला. काका आणि पुतण्याने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीची १ हजार रोपे लावली होती. यासाठी त्यांना १५ हजार रूपये खर्च आला होता. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की सध्या त्यांची स्ट्रॉबेरी ३०० रूपये प्रति किलोने विकली जात आहे.

आतापर्यंत त्यांनी ४५ हजार रूपये कमावले आहेत. काका पुतण्याने उत्पादन खर्चाच्या तिप्पट नफा आताच मिळवला आहे. काही दिवसांपुर्वी या काका पुतण्याने एका कृषी संमेलनाला भेट दिली होती. त्यात त्यांना महाडमधील एका शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीचा प्रयोग केल्याची माहिती मिळाली.

त्यापासून त्यांनाही प्रेरणा मिळाली आणि त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. महाड हे कोकणातील एक ठिकाण आहे. पनवेलपासून १३० किलोमीटरवर दमट हवा असलेलं हे ठिकाण आहे.

त्यांच्या डोक्यात विचार आला की जर महाडमध्ये हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो तर पनवेलमध्ये का होऊ शकत नाही. मग त्यांनी स्टॉबेरी पिकाची लागवड केली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. काही महिन्यांतच त्यांना स्टॉबेरीच्या रोपांच्या खर्चातून तिप्पट रक्कम परत मिळाली.

अजूनही ते स्टॉबेरीची विक्री करत आहेत आणि त्यांना त्यातून भरघोस उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड केली त्यामुळे त्यांच्या स्टॉबेरीला मोठी मागणी आहे.

त्यांच्याकडे मागणीएवढा स्ट्रॉबेरीचा साठा नसल्याने लवकरच ते मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची लागवड करणार आहेत. सध्या या काका पुतण्याची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांच्या या स्टॉबेरीच्या प्रयोगामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.