शेतकऱ्याचा नादच नाय! पारनेरच्या या शेतकऱ्याने तैवान पिंक पेरू शेतीतून केली ४० लाखांची कमाई

0

आज बरेच शेतकरी आधुनिक शेतीतून भरगोस उत्पादन मिळवत आहेत. काही शेतकरी काही वेगळी पिके घेऊन आपले नशीब उजळवत आहेत. आज आम्ही अशाच एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत.

पारनेरच्या या शेतकऱ्याने पेरूच्या बागेतून तब्बल ४० लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. पारंपारिक शेतीच्या ऐवजी बाळासाहेब गुंजाळ यांनी फळ शेतीकडे आपला मोर्चा वळवला. यातून त्यांना चांगलाच आर्थिक फायदा झाला.

विशेष म्हणजे त्यांनी कमी पाण्यात आणि कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. दहा एकर पेरूतून त्यांनी १४ महिन्यात महिन्यात ४० लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. नगरला पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथे त्यांची शेती आहे.

त्यांची अपेक्षा आहे की आणखी तीन महिन्यात त्यांना २० लाखांचे उत्पन्न मिळेल. त्यांनी तैवान पिंक पेरूची लागवड केली होती. पारनेर तालुक्यात शेतीची वेगवेगळी पिके घेतली जातात. पण तेथील शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळत नाही.

याच ठिकाणी बाळासाहेब गुंजाळ यांची ३५ एकर शेती आहे. या शेतीतील १० एकरावर त्यांनी वर्षभरापुर्वी तैवान पिंक पेरूची लागवड केली होती. प्रत्येक एकरात त्यांनी साडेआठशे झाडे लावली. म्हणजे दहा एकरात साडेआठ हजार झाडे लावली.

त्यांना ही लागवड करण्यासाठी साडेसात ते १० लाखांपर्यंत खर्च आला होता. पेरूच्या लागवडीनंतर अवघ्या महिन्यातच पेरूचे उत्पादन सुरू झाले. चार महिन्यातच त्यांनी चक्क ४० लाखांचे पेरू विकले आहेत. आणि त्यांचे म्हणणे आहे की चार महिन्यात त्यांना साधारण आणखी २० लाखांचे पेरूचे उत्पादन मिळेल.

तैवान पिंक पेरूला खुप मागणी आहे. ४०० ते ९०० ग्रॅम या पेरूचे वजन असते. हा पेरू अतिशय मऊ आणि गोडीला कमी असतो. या कारणामुळे या पेरूला मागणी जास्त आहे. या पेरूची टिकण्याची क्षमता जास्त असल्यामुळे या पेरूला लांब लांबच्या बाजारपेठेत पाठवता येते.

त्यामुळे उत्पन्नात घट होत नाही. या पेरूची बाग फुलवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यांनी बागेला कोंबडी खत आणि शेणखत पुरवले होते. रोज प्रत्येक एकराला अर्धा तास ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले गेले.

या पेरूसाठी रासायनिक खताची आजिबात गरज नाही, अशी माहिती बाळासाहेब गुंजाळ यांनी दिली आहे. त्यांना तैवान पिंक पेरू खुप नफा मिळवून देत आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. सध्या सगळीकडे त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची चर्चा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.