शेवटी आई वडिलांचे कष्ट फळाला आले, पोरगा एमपीएससी परीक्षेत राज्यात आला आठवा

0

२०२० या वर्षात आपण अनेक माणुसकीला प्रेरणा देणारे आणि अभिमानास्पद गोष्टी आपण पहिल्या. आता याच प्रेरणादायक कथांच्या यादीत शरण गोपीनाथ कांबळे हे नाव ऍड झाले आहे. महाराष्ट्रातील या शेतकऱ्याच्या मुलाने पहिल्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रहिवासी असलेल्या शरणने परीक्षेत आठवे स्थान मिळविले आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्या जिल्ह्यातील लोकांनी त्याच्या विजयाबद्दल खूप आनंद व्यक्त केला.

शरणच्या मते, यशाकडे जाणारा रस्ता हा खूप खडतर आहे. त्याचे कुटुंब शेवटपर्यंत संघर्ष करण्यासाठी धडपडत होते. त्याचे वडील गोपीनाथ कांबळे शेतात काम करून थोड्या प्रमाणात पैसे कमवत असताना, त्याची आई सुदामाती पोटापाण्यासाठी भाजीपाला विकत असल्याचे द लॉजिकल इंडियनने सांगितले आहे.

त्यांना खूप आर्थिक संघर्ष करावा लागत होता. शरणच्या कुटुंबाला एक वेळचे जेवण देखील मिळत नव्हते. तरीही त्यांनी शरणला अभ्यास करण्यासाठी व कठोर परिश्रम करण्यास भाग पाडले.

मिळालेल्या माहितीनुसार, शरणने बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम. टेक पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर एका खासगी कंपनीत त्यांना वार्षिक २० लाख रुपये उच्च पगाराची नोकरीदेखील देण्यात आली होती, परंतु त्याचे तिथे मन लागत नव्हते.

मग त्याने यूपीएससी परिक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्याने ती पहिल्याच प्रयत्नात पास केली आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आज तो अनेक मुलांसाठी आदर्श ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.