जबरदस्त! रासायनिक शेतीला फाटा देत केली जैविक शेती, दोन वर्षात झाली दुप्पट कमाई

0

आजच्या काळात अनेक शेतकरी रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय किंवा जैविक शेतीचा पर्याय निवडत आहेत. रासायनिक शेतीमुळे जमीन नापिक होते आणि नंतर उत्पादनातही आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो.

अशाच एका शेतकऱ्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांनी जैविक शेती करून दुप्पट उत्पन्न कमावले आहे. गुजरातमधील कांतिलाल भिमानी यांनी पारंपारिक शेतीतून बाहेर पडून जैविक शेतीचा पर्याय निवडला.

पारंपारिक पिकांच्या ऐवजी त्यांनी केळीची बाग फुलवली. केळीच्या बागेसोबत त्यांनी जैविक शेतीचा पर्याय निवडला. ते आधी कापूस आणि एरंडची शेती करत होते पण त्यांना जास्त फायदा होत नव्हता.

त्यामुळे कांतिलाल यांनी कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून आधुनिक शेती करण्याबाबत मार्गदर्शन घेतले. गोमुत्र आणि शेणापासून जिवामृत तयार करून शेतीसाठी लागणारा खर्च कमी केला.

त्यांच्याकडे ४ एकर शेती आहे. कांतिलाल यांनी जिवामृताचा वापर केल्याने जमिनीतील नायट्रोजन वाढण्यास खुप मदत झाली. जिवामृत पिकाला देण्यासाठी त्यांनी ड्रिप इरिगेशनचा वापर केला.

त्याचा फायदा असा झाला की पिकांचे किड्यांपासून होणारे नुकसान झाले नाही. नंतर त्यांनी पिक बदलण्याचा निर्णय घेतला. कापसाऐवजी त्यांनी केळीची बाग फुलवण्याचा निर्णय घेतला. जीवामृत दिल्याने फळाच्या चवीमध्येसुद्धा बराच फरक पडला.

जैविक शेती केल्याने त्यांचा रासायनिक औषधे, केमिकल्स, मजुरीचा असा सगळाच खर्च वाचला. त्यामुळे त्यांना उत्पादन खर्चात बरीच बचत झाली. कांतिलाल यांनी जेव्हा केळीची बाग फुलवली तेव्हा त्यांना सुरूवातीच्या काळात प्रतिकिलोला त्यांना २८ हजार केळीचे उत्पन्न आले होते.

यामधून त्यांना १ लाख ४० हजार रुपये मिळाले. त्यांना उत्पादन खर्च फक्त ६० हजार आला होता. दुसऱ्या वर्षी ३० हजार किलोने त्यांची केळी विकली गेली. त्यातून त्यांना १ लाख ८७ हजार रूपये मिळाले होते.

उत्पादनाचा खर्च जर वगळला तर त्यांना १ लाख ३७ हजार निव्वळ नफा झाला होता. तिसऱ्या वर्षी त्यांना ३० हजार किलोने केळीचे उत्पादन मिळाले. त्यावेळी त्यांना २ लाख २५ हजार रुपये मिळाले.

उत्पादन खर्च त्यावेळी ७० हजार आला होता. कांतिलाल यांनी जिवामृताची विक्री करण्याचाही व्यवसाय सुरू केला आहे. गावातील इतर शेतकऱ्यांना ते जिवामृत विकतात. त्यांना सरदार पटेल कृषी पुरस्कार २०१०, बेस्ट आत्मा प्रकल्प शेतकरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.