देशी जुगाड! ट्रॅक्टर घ्यायला पैसे नव्हते, शेतकऱ्याने घरीच बनवला बुलेटचा ट्रॅक्टर

0

एका शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर विकत घ्यायला पैसे नव्हते म्हणून त्याने घरीच ट्रॅक्टर बनवला. लातूरच्या या शेतकऱ्याने भंगारातल्या बुलेटपासून घरीच ट्रॅक्टर बनवला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हा ट्रॅक्टर शेतीची सगळी कामे करतो आणि दीड टनापर्यंत ट्रॉलीही ओढतो.

आणि केवळ अनुभवाच्या जोरावर त्यांनी हा कारणामा करून दाखवला आहे. मकबूल शेख असे त्यांचे नाव आहे. त्यांनी यासाठी कोणतेही तांत्रिक शिक्षण घेतलेले नाही. सातवीपर्यंत शिकलेले मकबूल शेख फक्त सातवीपर्यंत शिकलेले आहेत.

ते लहानपणापासून ट्रॅक्टर रिपेअरिंगचे काम करतात. निलंगा शहरात त्यांचे शेतीच्या अवजारांचे शॉप आहे. या वर्कशॉपमध्ये त्यांनी हा बुलेट ट्रॅक्टर बनवला आहे. २०१६ मध्ये त्यांना हा ट्रॅक्टर बनवण्यासाठीची कल्पना सुचली.

हा ट्रॅक्टर बनवण्यासाठी त्यांना २ वर्षांच्या कालावधी लागला. त्यानंतर वर्षभर त्यांनी शेतात ट्रक्टरची ट्रायल घेतली. आता त्यांच्याकडे ट्रक्टर बनवून घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बनवून दिला आहे.

मकबूल म्हणाले की लहान शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन मी हा ट्रॅक्टर बनवला आहे. शेतकऱ्यांना सात ते आठ लाखांचा ट्रक्टर खरेदी करणे शक्य नसते. बुलेट ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना स्वस्तात मस्त पर्याय उपलब्ध झाला आहे.

पेरणी, खुरपणी, कीटकनाशके यासाठी त्या ट्रॅक्टरचा वापर केला जातो. १० हॉर्सपॉवर असलेल्या या ट्रॅक्टरची किंमत १.६० लाख रुपये आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून ट्रॅक्टर बनवून घेतला आहे. सध्या सगळीकडे याच ट्रॅक्टरची चर्चा आहे. अनेक जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्याकडे ट्रॅक्टर बनवून घेण्यासाठी येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.